ही कसली आई? रडतंय म्हणून बाळाला आधी मार मार मारलं; मग तोंडात मसाला भरला, VIDEO पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल
एक संतापजनक घटना समोर आली आहे. आई आपल्या लेकरासाठी खूप काबाडकष्ट करत असते, पण तीच आई मुलाच्या जीवावर उठली तर काय?
अशाच एका क्रूर आईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या आईने आपल्या बाळाला इतका त्रास दिला, जितका कोणी सावत्र आईदेखील देणार नाही. या महिलेनं आपल्या १० महिन्यांच्या बाळाला रडतंय म्हणून आधी मार मार मारलं आणि मग त्याच्या तोंडात मसाला भरला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल.
आई होणं हे जगातील सर्वांत मोठं आणि सुंदर सुख असतं. नऊ महिने आपल्या गर्भात बाळ वाढवून, त्रास सहन करून आपल्या मुलाला जन्म देणाऱ्या आईला देवासमान मानलं जातं. त्यामुळे जीवनात आईचा दर्जा हा कायमच मोठा असतो. मात्र, या महिलेचं कृत्य पाहून एक आई असं काही करू शकते यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या महिलेने आपल्या बाळाला हातात घेतलं आहे. बाळ रडत असल्यानं सुरुवातीला ती त्याला घेऊन फिरत आहे; मात्र बाळ रडायचं थांबत नसल्यानं पुढच्याच क्षणी ही महिला क्रूरपणे बाळाला मारू लागते. त्यानंतर ही आई एका कोपऱ्यात आपल्या बाळाला मांडीवर घेऊन बसते. तिथेदेखील बाळ रडत असतं म्हणून ही महिला पुन्हा पुन्हा त्याला मरते. हा व्हिडीओ पाहतानाही अंगावर काटा येतो.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये सरकारी शिक्षक असलेल्या मंझनपूरच्या खेरवा (बरौला) येथील सत्येंद्र कुमारने दोन वर्षांपूर्वी श्वेता गौतम हिच्याशी लग्न केलं. लग्नानंतर १० महिन्यांनी त्यांची मुलगी शान्वी हिचा जन्म झाला. पण सत्येंद्र सांगतात, “मुलीच्या जन्मापासूनच श्वेताचा स्वभाव चांगला नव्हता. तिनं आपल्या मुलीला ओझे मानलं. मुलगी जेव्हा कधी रडायची तेव्हा श्वेता चिडायची आणि तिला मारहाण करायची.” मुलगी रडल्यावर पत्नी तिच्या तोंडात लाल मिरची पावडर टाकत असे, असा आरोप या महिलेच्या नवऱ्यानं केला आहे. तो पुढे सांगतो की, मला शेजारचेही सांगायचे म्हणून मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये तिचं कृत्य दिसलं. त्यानंतर मी पोलिसांत तक्रार केली.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही यावर संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत.
0 Comments