-->

Ads

लिफ्ट देतो सांगत कारमध्ये बसवलं, तरूणीवर सामूहिक अत्याचार

 

Mumbai Crime : लिफ्ट देतो सांगत कारमध्ये बसवलं, तरूणीवर सामूहिक अत्याचार

मुंबईतील वांद्रे येथे एका तरूणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचे उघड झालं आहे. वांद्रे येथील निर्मलनगर परिसरात 18 वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर दोघांनी सामूहिक अत्याचार केला.


राज्यातील महिला-तरूणींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढलं आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरूणीवर तीन अज्ञात तरूणांनी सामूहिक अत्याचार केला होता. ते गुन्हेगार अजून मोकाटच फिरत आहेत. या भयानक घटनेचे गुन्हेगार अजून पकडले गेलेले नसतानाच आता मुंबईतील वांद्रे येथे एका तरूणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचे उघड झालं आहे. वांद्रे येथील निर्मलनगर परिसरात 18 वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर दोघांनी सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणी निर्मलनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी एकाला अटक केली असून दुसऱ्याचा शोध घेतला जात आहे.

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवलं, पाण्यातून गुंगीच औषध दिलं

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील निर्मलनगर परिसराजवळ ही घटना घडली. तेथे एका 18 वर्षांच्या तरूणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. दोन आरोपींनी पीडित तरूणीला घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमधून लिफ्ट दिली. ती कारमध्ये बसल्यानंतर त्यांनी तिला पाणी प्यायला दिलं. मात्र त्यामध्ये गुंगीचं औषध होतं. ते पाणी पिताच पीडित तरूणी बेशुद्ध पडली. हीच संधी साधत आरोपींनी तिला अज्ञात स्थळी नेलं आणि आळीपाळीन तिच्यावर अत्याचार केला, असा आरोप तरूणीने केला आहे. तसेच या पर्काराबाबत तोंड उघडलं किंवा कुठेही वाच्यता केली तर तुला जीवे मारू अशी धमकीही आरोपींनी आपल्याला दिली, असा आरोपही तिने लावला.

मात्र आपल्यावरील अत्याचाराल वाचा फोडून गुन्हेगारांना शिक्षा मिळालीच पाहिजे असा निर्धार करत पीडित तरूणीने निर्मलनगर पोलीस ठाणं गाठलं आणि तेथे सर्व प्रकार कथन करत तक्रार नोंदवली. त्याआधारे पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला. आरोपींपैकी एक फिरोज अब्दुल मोतीन खान याला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसऱ्या आरोपीचा अद्याप शोध सुरू आहे.

पुण्यात बोपदेव घाटात तरूणीवर सामूहिक अत्याचार

मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका तरूणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केला. पुण्यातील बोपदेव घाटात गँगरेप करण्यात आल्याचा हा भयानक प्रकार उघडकीस आला . बोपदेव घाटामध्ये सातत्याने लूटमारीच्या घटना घडत असतात. मात्र तेथे एका तरूणीवरती तिघांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली. पीडित महिलेला तिच्या मित्राने तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी 21 वर्षांची असून ती फिरायला मित्रासोबत बोपदेव घाटात गेली होती. मात्र तेवढ्यात तिथे तीन अनोळखी लोक आले आणि त्यांनी मित्राला मारहाण करून त्याला डांबून ठेवलं. त्यानंतर त्या तिघांनी पीडित तरूणीवर सामूहिक अत्याचार केला.

Post a Comment

0 Comments