निवडणूक काळात लोखंडी पेट्यांमधून घेऊन जात होता एक कोटी रुपयांची रोकड, पोलिसांच्या नजरेत आला अन्…
How Much Cash Are You Allowed To Carry During Elections: वाहनामध्ये सापडलेल्या रक्कमेबाबत वाहन चालकाकडे पोलिसांनी खुलासा मागितला. परंतु त्या वाहन चालक योग्य खुलासा दिला नाही. यामुळे ही रक्कम पोलिसांनी जप्त केली. त्यानंतर यासंदर्भात निवडणूक आयोगाला कळवले आहे.
तपासणी केली अन्…
नांदेड पोलिसांनी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील तपासणी नाक्यावर एक कोटी पाच लक्ष रुपयांची रक्कम पकडली आहे. ही रक्कम भाग्यनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या तपासणी नात्यावर पकडली आहे. तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू असताना एक चार चाकी वाहनाचा पोलिसांना संशय आला. या वाहनाची तपासणी करत असताना लोखंडी पेट्यांमध्ये ठेवलेले एक कोटी पाच लक्ष रुपये पोलिसांना आढळून आले.
रक्कमेचे स्पष्टीकरण न दिल्याने जप्त
वाहनामध्ये सापडलेल्या रक्कमेबाबत वाहन चालकाकडे पोलिसांनी खुलासा मागितला. परंतु त्या वाहन चालक योग्य खुलासा दिला नाही. यामुळे ही रक्कम पोलिसांनी जप्त केली. त्यानंतर यासंदर्भात निवडणूक आयोगाला कळवले आहे. ही रक्कम कुठून आली, कुठे जात होती, हे कुणाची रक्कम आहे याबाबत आता पोलिसांचा तपास सुरू आहे, असे नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले.
रोकड नेण्याचे काय आहे नियम
निवडणूक काळात निवडणूक आयोगाच्या आचारसंहितानुसार ५० हजारापर्यंतची रक्कम कोणत्याही पुराव्याशिवाय नेता येते. परंतु त्यापेक्षा जास्त रक्कम असल्यास त्याचा पुरावा सोबत हवा. तसेच एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी रोकड नेताना दोन्ही ठिकाणी त्याचे रेकॉर्ड ठेवणे गरजेचे आहे.
0 Comments