-->

Ads

१४ वर्षीय गरोदर नातीची आजीने घरीच केली प्रसृती; नवजात बाळाला पिशवीत गुंडाळून फेकले

१४ वर्षीय गरोदर नातीची आजीने घरीच केली प्रसृती; नवजात बाळाला पिशवीत गुंडाळून फेकले

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये दोन दिवसांच्या नवजात मुलीला फेकून देणाऱ्या नर्सला पोलिसांनी अटक केली आहे.


Bhopal Crime : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये बुधवारी बंद  पिशवीत अवस्थेत सापडलेल्या दोन दिवसांच्या नवजात मुलीचा गुरुवारी मृत्यू झाला. याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. नवजात मुलगी ही आठवीतील विद्यार्थिनी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलीची आजीने एका डॉक्टरच्या मदतीने प्रसृती केली होती. त्यानंतर नर्सने ते बाळ फेकून दिलं. हे प्रकरण समोर आल्यानंतर जिवंत नवजात बाळाला फेकून देणाऱ्या नर्स, डॉक्टर आणि मुलीची आजी यांना तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी तिघांचे जबाब नोंदवले असून, त्यात नर्सने धक्कादायक खुलासा केला आहे.
भोपाळच्या ऐशबागमध्ये पिशवीत सापडलेल्या दोन दिवसांच्या नवजात मुलीचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. तिथल्याचे एका नर्सने या नवजात मुलीला पिशवीतून फेकून दिलं होतं. एका सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला. पीडित मुलीवर शेजारच्या चुलत भावाने बलात्कार केला होता. अल्पवयीन मुलगी ही सात महिने गरोदर होती. गर्भपात करु न शकल्याने मुलीच्या आजीने गुपचूप तिची प्रसृती करण्याचा निर्णय घेतला होता.

यासाठी मुलीच्या आजीने अशोका गार्डनमध्ये क्लिनिक चालवणारे डॉ.सुरेंद्र नहार यांच्याशी संपर्क साधला. डॉ.नहार यांनी नर्स फिरदौस खान यांच्याशी मुलीच्या कुटुंबाची ओळख करून दिली. नर्सने ६० हजार रुपये आगाऊ घेऊन अल्पवयीन प्रसूती करून घेतली आणि नवजात अर्भकाला फेकून दिले आणि घरी परतली. मात्र तिथल्या एका सीसीटीव्हीमध्ये ही सर्व घटना कैद झाली. नवजात मुलगी सापड्यानंतर पोलिसांनी शोधाशोध केली असता त्यांना सीसीटीव्हीमध्ये नर्स फिरदौस खान दिसली.

यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीची आजी, नर्स आणि प्रसूती करणारे डॉक्टर सुरेंद्र नहार यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवजात मुलीला फेकण्यासाठी वापरलेली मोपेडही जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी नवजात मुलीला फेकणाऱ्या आरोपीची ओळख पटवण्यासाठी रोड मॅप तयार केला आणि बाग उमराव दुल्हा ते नवीन नगरपर्यंत ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपी महिलेच्या घरापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.

सर्वात आधी पोलिसांनी नर्सला अटक केली, तिने चौकशीदरम्यान सहकारी डॉ सुरेंद्र नहारचे नाव उघड केले. या दोघांच्या माहितीनुसार, पोलिसांनी अखेर अल्पवयीन मुलीच्या घरी पोहोचून संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले. अल्पवयीन मुलीच्या आजीकडे चौकशी केली असता पीडितेचे १७ वर्षीय चुलत भावासोबत शारीरिक संबंध असल्याचे उघड झाले. त्यांना याबाबत माहिती मिळेपर्यंत गर्भातील बाळ मोठं झालं होतं. त्यांनी गर्भपात करण्यासाठी डॉक्टरांची भेट घेतली. मात्र तसे झाल्यास डॉक्टरांनी मुलीच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले.

दरम्यान, बुधवारी अल्पवयीन मुलीने सातव्या महिन्यात एका नवजात बाळाला जन्म दिला. डॉक्टरे त्याची सहकारी नर्स फिरदोश खान हिच्यासोबत बाळाची घरीच प्रसूती करून दिली आणि नवजात बाळाला पिशवीत टाकून फेकण्यासाठी नर्सला दिले. त्याबदल्यात डॉक्टर आणि नर्सने अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांकडून ६० हजार रुपये घेतले होते.


Post a Comment

0 Comments