ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
देशभरात आणि घरोघरी दिव्यांची उजळण करून आणि विद्युत रोषणाईने घरे उजळून निघाली असतानाच दिवाळीच्या पूर्वसंध्येला नवी मुंबईत घडलेल्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
देशभरात आणि घरोघरी दिव्यांची उजळण करून आणि विद्युत रोषणाईने घरे उजळून निघाली असतानाच दिवाळीच्या पूर्वसंध्येला नवी मुंबईत घडलेल्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घरातील 5 किलोच्या दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली होती, त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, या भीषण स्फोटात घरातील 3 जणांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये, एक महिला, 15 वर्षाची मुलगी आणि 8 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. तर, कुटुंबातील 1 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
0 Comments