-->

Ads

सॅल्युट झालाच पाहिजे! पंजाबमधील तिहेरी हत्याकांडातील आरोपींच्या महाराष्ट्रात फिल्मी स्टाईलने आवळल्या मुसक्या, काय घडलं?

सॅल्युट झालाच पाहिजे! पंजाबमधील तिहेरी हत्याकांडातील आरोपींच्या महाराष्ट्रात फिल्मी स्टाईलने आवळल्या मुसक्या, काय घडलं?

साऊथच्या चित्रपटापेक्षा खतरनाक थ्रिलर सत्यामध्ये घडला. पंजाबमधील तिहेरी हत्याकांडातील आरोपी, ज्यांच्या मागावर पंजाब पोलीस आहेत. ते आरोपी दुसऱ्या राज्यात असल्याची टीप लागली, त्यानंतर महाराष्ट्रातील पोलिसांनी त्यांना सापळा लावत ताब्यात घेतलं. नेमकं काय प्रकरण आहे आणि काय घडलं जाणून घ्या.


पंजाब येथील फिरोजपूर येथील तिहेरी हत्याकांडाने सर्व देश हादरून गेल होता. एका बहिणीसह दोन भावांची गाडीवर गोळीबार करत हत्या करण्यात आली होती. पंजाब पोलीस आरीपींच्या मागावर होते. मात्र पोलिसांना हुलकावणी देत त्यांनी राज्यातून बाहेर पलायन केलं होतं.  पंजाब पोलिसांना आरोपींच्या ठिकाणाची खबर लागली. या हत्येमधील आरोपी महाराष्ट्रात असून ते समृद्धी महामार्गाने नांदेडकडून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. महाराष्ट्रात संपर्क करत छत्रपती संभाजीनरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना फोन करत मदत मागितली. त्यानंतर आयुक्तांनी आपली यंत्रणा कामाला लावली.  त्यानंतर कशा पद्धतीने त्यांना ताब्यात घेतलं जाणून  घ्या.

पहाटे तीन वाजल्यानंतर यंत्रणा कामाला लागली.  त्यावेळी एमएच १२ एसी ५५९९ या क्रमांकांची भरधाव वेगाने समृद्धी महामार्गावरून जात असल्याची माहिती समजली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे आणि सिडको पोलीस ठाण्याचे गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्त्वाखाली १० अधिकाऱ्यांसह ४० जणांचे पथक आणि QRT पथकाने बुलेटप्रुफ जॅकेट घातले. सकाळी पावणे सहा वाजता नागपूर समृद्धी महामार्गावरून सात आरोपींना ताब्यात घेतलं.

भरधाव वेगाने पळत असलेल्या या इनोव्हा गाडीला चक्रव्युव्हात अडकून या आरोपींना शिताफिने ताब्यात घेतलं. दरम्यान या 7 ही शार्प शूटर आरोपींना संध्याकाळपर्यंत पंजाब पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या सर्व आरोपींना वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे पोलीस आयुक्तांच्या हस्ते त्यांचं अभिनंदन करण्यात आलंय.

पंजाब मधील फिरोजपुर 3 सप्टेंबर रोजी हत्याकांड घडले होते. तेव्हापासून पंजाब पोलीस त्यांच्या मागावर होते पंजाब पोलिसांनी याबाबत आम्हाला गोपनीय माहिती दिली की ते महाराष्ट्रात आहे. त्यानंतर आमच्या टीम समृद्धी महामार्गावर 10 अधिकारी आणि 40 कर्मचाऱ्यांचा फौज फाटा घेऊन दाखल झाली. त्यावेळी नांदेडकडून संभाजीनगरकडे येत असताना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये एकूण 7 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलं. दुपारपर्यंत पंजाब पोलीस दाखल होणार असून त्यानंतर या सर्व जणांना त्यांच्या त्याब्यात देणार असल्याचं पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितलंय


Post a Comment

0 Comments