भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
Bhandara News : चार वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न आणि आईचा विनयभंग केल्या प्रकरणी लाखांदूर तालुक्यात पीडित कुटुंबानं न्यायासाठी मोर्चा काढला होता. यावेळी
भंडारा : लाखांदूर (Lakhandur) तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी चार वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न आणि आईचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. यानंतर पीडित कुटुंबानं न्यायासाठी मोर्चा काढला असता आरोपींनी वृद्ध महिलेवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, लाखांदूर तालुक्यातील कोदामेंढी इथल्या नाथजोगी समाजातील चार वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला तर तिच्या आईचा विनयभंग केल्याची घटना 17 जुलैला घडली होती. या प्रकरणात दिघोरी पोलिसांनी आरोपींवर कारवाई न करता त्यांना अभय दिल्याचा आरोप करीत नाथजोगी समाज बांधवांनी दोन दिवसापूर्वी लाखांदूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.
वृद्ध महिला गंभीर जखमी
आरोपींना अटक आणि ठाणेदारावर कारवाई करण्याची मागणी या मोर्चातून करण्यात आली होती. न्यायासाठी मोर्चा काढल्यानंतर पीडितेच्या कुटुंबावर आरोपींनी हल्ला केला. यात पीडितेची सासू सयाबाई वाडस्कर (60) गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात येत आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.
0 Comments