-->

Ads

सोसायटीत पार्किंगमध्ये गाडी लावण्यावरुन वाद टोकाला, नवी कोरी गाडी चक्काचूर

सोसायटीत पार्किंगमध्ये गाडी लावण्यावरुन वाद टोकाला, नवी कोरी गाडी चक्काचूर

इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांकडे आता कार असणं ही सामान्य गोष्ट झाली आहे. पण कारची संख्या वाढत असताना कार पार्किंगची जागा मात्र आता कमी पडू लागली आहे. त्यामुळेच सोसायट्यांमध्ये गाडी लावण्यावरुन वाद होऊ लागले आहेत. अनेक सोसायट्यांमध्ये ही समस्या गंभीर बनली आहे. अशाच एक सोसायटीतील वाद एका व्हिडिओमध्ये कैद झाला आहे.



सोसायटीमध्ये पार्किंग वरुन होणारे वाद आता काही सामान्य राहिलेले आहे. इमारतीत राहणाऱ्या प्रत्येकाकडे आता कार आणि बाईक असतातच. त्यामुळे इमारतीत गाड्या लावण्यासाठी जागा कमी पडू लागली आहे. यामुळे इमारतीच्या पार्किंग जागेत गाड्या लावण्यावरुन मोठे वाद होतात. अनेक सोसायटींमध्ये असं चित्र असतं. असाच एक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये पार्किंगवरुन वाद झाल्याने समोरच्या व्यक्तीने पूर्ण गाडीच बॅटने फोडली. ही संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद झाली. दोन्ही घरांमधील वाद इतका टोकाला गेला की, वाहन फोडून टाकले आणि चालकाला देखील मारहाण करण्यात आली. ही घटना नोएडा सेक्टर-72 मधली आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती हातात बॅट घेऊन लाल रंगाची गाडी फोडताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पार्किंगमध्ये गाडी लावण्यावरुन आधी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर तो इतका वाढला की, समोरच्या व्यक्तीने गाडीच फोडली. संपूर्ण घटना पोलीस स्टेशनपर्यंत गेल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, सेक्टर-72 मध्ये राहणारे राजीव चौहान यांचा नितीन यांच्यासोबत कार लावण्यावरुन वाद झाला. पार्किंगवरून दोघांमध्ये आधी भांडण झाले. त्यानंतर ते हाणामारी आणि शिवीगाळात पोहोचले.

नितीनच्या बाजूच्या लोकांनी राजीव या व्यक्तीला मारहाण केली. राजीवला गंभीर जखमी केले. हे पाहताच राजीवच्या मुलांनी काठ्या, बॅट घेऊन नितीनच्या गाडीची तोडफोड केली. तरुणांनी मिळून जोडप्याला मारहाण केल्याचा आरोपही आहे.

दोन्ही बाजूचे लोकं या व्हिडिओत आपापसात भांडताना दिसत आहेत. गाडीच्या सर्व खिडक्यांच्या काचा फोडल्या गेल्या. व्हिडिओमध्ये काही महिला देखील दिसत आहेत. प्रकरण खूपच चिघळलं. एका कारच्या पार्किंगवरून लोकांमध्ये जोरदार वाद झाला. कोणीही संयमाने बोलताना दिसत नव्हते. त्यामुळे दोघांना नुकसान सहन करावे लागले.



याप्रकरणात पोलिसांनी दोघांच्या तक्रारी दाखल करत दोघांवर कारवाई केली आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली. पण असे प्रकरणं सोसायटींमध्ये वाढत चालले आहेत. पार्किंगचा विषय चिंताजनक बनत चालला आहे

Post a Comment

0 Comments