-->

Ads

पुण्यात चालले काय? वनराज आंदेकरनंतर दुसरी हत्या, शतपावलीसाठी निघाला अन् जीव गमावला

पुण्यात चालले काय? वनराज आंदेकरनंतर दुसरी हत्या, शतपावलीसाठी निघाला अन् जीव गमावला

Pune Crime News: पुण्यातील या दुसऱ्या हत्येनंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. परंतु अद्याप कोणाला अटक केलेली नाही. वासुदेव कुलकर्णी यांच्या खुनाचे कारण अजून समोर आले नाही. पोलिसांनी हल्लेखोराच्या शोधासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली आहे.



पुणे शहरात काय चालले आहे? गुन्हेगारी किती वाढली आहे. कोयते हल्ले किती होत आहेत, पुण्यात पोलिसांची दहशत गुन्हेगारांना वाटत आहे का? असे प्रश्न निर्माण होणारी परिस्थिती आहे. पुणे शहरातील मुख्य बाजारपेठ अन् कायम गजबलेला परिसर असलेल्या नाना पेठेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती. त्या घटनेनंतर पुणेकर भयभीत झाले. त्यातून पुणेकर सावरत नाही तोच काही तासांचा आता दुसरी हत्या झाली. शतपावालीसाठी निघालेल्या पुण्यात फायनस कंपनीत मॅनेजर म्हणून असलेल्या व्यक्तीची हत्या झाली. वासुदेव कुलकर्णी असे या त्या व्यक्तीचे नाव आहे.

हडपसरमध्ये दुसरी हत्या

पुण्यात 24 तासाच्या आत पुन्हा दुसरी हत्या झाली आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करण्याचा कट नियोजनपूर्वक गुन्हेगारांनी रचला. आधी त्या परिसरातील लाईट बंद करण्यात आली. त्यानंतर दुचाकीवर आलेल्या तीन ते चार जणांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. वनराज आंदेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना तिथून हल्लेखोरांनी पळ काढला. या दहशतीमधून पुणेकर सावरत नाही तोपर्यंत हडपसर परिसरात दुसरी हत्या झाली.

शतपावलीसाठी निघाले अन् जीव गेला

पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या गाडीतळावर मध्यरात्री फायनस मॅनेजरची हत्या करण्यात आली. चाळीस वर्षीय वासुदेव कुलकर्णी घरासमोर शतपावली करत होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांचे निधन झाले होते. वासुदेव कुलकर्णी हे पुण्यातील एक प्रतिष्ठित फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होते.

पुण्यातील या दुसऱ्या हत्येनंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. परंतु अद्याप कोणाला अटक केलेली नाही. वासुदेव कुलकर्णी यांच्या खुनाचे कारण अजून समोर आले नाही. पोलिसांनी हल्लेखोराच्या शोधासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली आहे.


 

Post a Comment

0 Comments