-->

Ads

मुख्याध्यापकांनी केली दिव्यांग विद्यार्थ्याला नॉनव्हेज खाण्याची सक्ती, तक्रारीनंतर निलंबन

मुख्याध्यापकांनी केली दिव्यांग विद्यार्थ्याला नॉनव्हेज खाण्याची सक्ती, तक्रारीनंतर निलंबन

मिड डे मिल मध्ये नॉनव्हेज मागवलं आणि खाऊ घातलं असा आरोप एका दिव्यांग विद्यार्थ्याने केला.




Mid Day Meal News : सरकारी शाळांमध्ये माध्यान्ह भोजन Mid Day Meal योजना चालवली जाते. या योजनेच्या अंतर्गत शाळेच्या मुख्याध्यापकांनी एका मुलाला सक्तीने नॉनव्हेज खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतर शाळेत मोठा गोंधळ उडाला. तसंच पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेलं. ज्यानंतर या मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आलं आहे.

कुठे घडली ही घटना?

माध्यान्ह भोजनात ( Mid Day Meal ) नॉनव्हेज खायला द्यायची सक्ती करण्याचा हा प्रकार उत्तर प्रदेशातल्या मेरठ या ठिकाणी घडला आहे. शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद इकबाल यांनी शाळेत मुलांसाठी नॉनव्हेज मागवलं आणि ते एका मुलाला खाऊ घातलं. हा मुलगा दिव्यांग आहे. या मुलाने त्याच्या तक्रारीत सांगितलं की सर मला म्हणाले आज भाजी चांगली नाही. त्यामुळे नॉनव्हेज मागवा. मी नॉनव्हेज खाणार नाही असं सरांना सांगितलं तरीही त्यांनी नॉनव्हेज ( Mid Day Meal ) मागवलं आणि सक्तीने माझ्या भावाला खाऊ घातलं असा आरोप करण्यात आला आहे.

मुख्याध्यापकांनी आरोप फेटाळले

या घटनेनंतर माझा भाऊ तोंड झाकून खोलीत झोपला होता. त्याला अचानक काय झालं अशी विचारणा माझ्याकडे सगळ्यांनी केली. तेव्हा मी घडलेला प्रकार ( Mid Day Meal ) सांगितला. ज्यानंतर माझा मामा शाळेत आला आणि त्याने मुख्याध्यापकांना जाब विचारला. हे प्रकरण पोलिसांत गेलं, शाळेच्या या मुख्याध्यापकांना म्हणजेच मोहम्मद इकबाल यांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं.

मुख्याध्यापक मोहम्मद यांचं निलंबन

मोहम्मद इकबाल यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. मी काही माध्यान्ह भोजनात ( Mid Day Meal ) नॉनव्हेज वगैरे मागवलं नाही. जे विद्यार्थी माझ्यावर आळ घेत आहेत तेच विद्यार्थी नॉनव्हेज घेऊन आले होते असं आता मुख्याध्यापक मोहम्मद इकबाल यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे त्यांनी जाणीवपूर्वक मुलाला नॉनव्हेज खाऊ घातल्याचा आरोप होतो आहे. हा आरोप झाल्याने त्यांचं निलंबन करण्यात आलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं काय?

या प्रकरणी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. शाळेत नॉनव्हेज कुणी मागवलं, का मागवलं याची आम्ही चौकशी करत आहोत. हे नॉनव्हेज मागवण्याचा उद्देश इतर मुलांना खाऊ घालणं असा असू शकतो. मात्र शाळेत अशा पद्धतीने नॉनव्हेज मागवणं आणि जे खात नाहीत त्यांना ते खाऊ घालणं गैर आहे. या प्रकरणी आम्ही शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद इकबाल यांना निलंबित केलं आहे. आता पुढील तपास करत आहोत आणि कारवाईही केली जाईल असं शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Post a Comment

0 Comments