Pune Crime News: 'तू मला आवडते, पळून जाऊन लग्न करू', रिक्षा चालकाने केला शाळकरी मुलीचा विनयभंग, पुण्यातील घटना
Pune Crime News: पुण्यात रिक्षाचालकाने शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त केला आहे. ही घटना पर्वती परिसरातील जनता वसाहत परिसरात घडली आहे.
पुण्यात रिक्षाचालकाने शाळकरी मुलीचा विनयभंग (Pune Crime News) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिक्षा चालवत असताना पुढे आरशात पाहत होता त्यावेळी तू मला आवडते, पळून जाऊन लग्न करू म्हणत रिक्षाचालकाने शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे.
तू मला आवडते. आपण पळून जाऊन लग्न करू, असे म्हणत रिक्षाचालकाने शाळकरी मुलीचा विनयभंग (Pune Crime News) केल्याचा प्रकार समोर आला, या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त केला आहे. ही घटना पर्वती परिसरातील जनता वसाहत परिसरात घडली आहे. याप्रकरणी रिक्षाचालका विरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मुलीच्या आईने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेची मुलगी शाळेतून रिक्षाने घरी निघाली होती. त्यावेळी रिक्षाचालकाने आरशातून मुलीकडे एकटक पाहून तिला इशारा केला. त्यानंतर मुलगी पुन्हा शाळेत निघाली. तेव्हा रिक्षाचालकाने तिचा पाठलाग केला. मुलीला जनता वसाहत पोलिस चौकीसमोर काही अंतरावर अडवलं. रिक्षाचालकाच्या त्रासामुळे घाबरलेल्या (Pune Crime News) मुलीने या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर रिक्षाचालकाविरुद्ध विनयभंग, तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला.
'तू माझ्याकडे बघत जा...', शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग
ण्यातील हडपसर भागात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणार्या मुलीचा शिक्षकाने विनयभंग (Pune Crime News) केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिक्षकाविरुद्ध हडपसर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पॉक्सो) त्याचबरोबर विनयभंग (Pune Crime News) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल (Pune Crime News) केला आहे.
'तू मला आवडतेस' शाळेतील स्कूल व्हॅन चालकाचे विद्यार्थिनीला इंस्टाग्रामवर मेसेज
शाळेतील स्कूल व्हॅन चालकाने विद्यार्थिनीला 'तू मला आवडतेस' असे मेसेज केले होते. स्कूल व्हॅन चालक वारंवार प्रत्यक्ष आणि इंस्टाग्रामवर सतत मेसेज करून विद्यार्थिनीला त्रास देत होता. या घटनेनंतर पालकांनी संताप (Pune Crime News) व्यक्त केला आहे, आम्ही तुमच्या विश्वासावर आमच्या मुलींना शाळेत पाठवतो आणि तुम्ही अशी कृत्ये करता असं म्हणत पालकांनी संताप व्यक्त केला आहे. तर स्कूल व्हॅन चालकावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा (Pune Crime News) दाखल करण्यात आला आहे.
0 Comments