-->

Ads

'पॉक्सो' गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या शिक्षकाकडून शाळेतील मुलीशी पुन्हा अश्लील चाळे

'पॉक्सो' गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या शिक्षकाकडून शाळेतील मुलीशी पुन्हा अश्लील चाळे

Pimpri Chinchwad Sexual Harassment: नराधम शिक्षक, प्राचार्य, ट्रस्ट अध्यक्षासह सात जण गजाआड; निगडी येथील शाळेतील धक्कादायक प्रकार



Pimpri Chinchwad Sexual Harassment: लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना निगडी येथेही असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहा वर्षांपूर्वी शाळेतील एका मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या खेळाच्या शिक्षकाने या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याच शाळेतील तेरा वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शिक्षकाला निगडी पोलिसांनी गजाआड केले आहे. तसेच एकदा गुन्हा दाखल झाल्यानंतरही पुन्हा त्याला शाळेत घेतल्याप्रकरणी शाळेच्या प्राचार्यांसह ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतरांनाही पोलिसांनीअटक केली आहे.

निवृत्ती देवराम काळभोर (रा. औंदुबर निवास, साई हौसींग सोसायटी, गुरुद्वारा, चिंचवड) या शिक्षकासह किर्ती शाळेचे प्राचार्य अशोक जाधव, लि साोफिया एज्युकेशन सोसायटी ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास बलभिम जाधव, अविंद्र अंकुश निकम, गोरख सोपान जाधव, हनुमंत दादा निकम आणि शुभांगी अशोक जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, लक्ष्मण नामदेव हेंद्रे हा फरार आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

निगडी येथे लि साोफिया एज्युकेशन सोसायटीचे किर्ती विदयालय आहे. या शाळेत पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आरोपी काळभोर हा शाळेत खेळाचा शिक्षक आहे. काळभोर हा पिडीत मुलीस वारंवार लैंगिक त्रास देत असे. पिडीत मुलीच्या वर्गातील विदयार्थ्यांना पिटीच्या क्लाससाठी ग्रांउडवर घेवून जात व येत असताना पिडीत मुलीशी अश्लील चाळे करीत असे. तसेच, हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला मारेन अशी धमकी देत असे.

२१ ऑगस्ट रोजी पिडीत मुलगी ही वॉशरूममधून बाहेर येत असताना काळभोर याने पुन्हा तिच्याशी अश्लील वर्तन केले. अखेर मुलीने घरच्यांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपी निवृत्ती काळभोर याच्याविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये शाळेतीलच एका अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयामध्ये  काळभोर हा न्यायालयातून जामिनावर बाहेर आला होता. तरीही त्याला शाळा व्यवस्थापनाने पुन्हा शाळेत नोकरी दिली.

निवृत्ती काळभोरसारखा विकृत वृत्तीचा व्यक्ती तुरुंगात होता हे माहित असतानादेखील शाळा व्यवस्थापनाने त्याला पुन्हा शाळेत नोकरीवर घेतले. हे एका पद्धतीने लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याला प्रोत्साहन दिल्यासारखे आहे. म्हणून शिक्षक निवृत्ती काळभोर याच्यासह शाळेचे प्राचार्य अशोक जाधव, तसेच,  ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास जाधव यांच्यासह इतर आरोपींना निगडी पोलिसांनी गजाआड केले आहे.


Post a Comment

0 Comments