कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात आंदोलनकर्त्या डॉक्टरांचा पोलिसांवर ‘हा’ आरोप, प्रकरण सीबीआयकडे
कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे.
सीबीआय पुढे कोणते प्रश्न आहेत
कोलकाता येथील ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार ( Kolkata Rape Case ) नाही तर सामूहिक बलात्कार झाला होता का?
संजय रॉय या मुख्य आरोपीशिवाय या घटनेत इतर आरोपीही होते का?
संजय रॉय शिवाय इतर आरोपी जर या घटनेत सहभागी होते तर त्यांच्याविषयी काय माहिती मिळाली आहे?
सुवर्ण गोस्वामी यांचा दावा काय?
डॉ. सुवर्ण गोस्वामी यांनी आणखी काय म्हटलं आहे?
सुवर्ण गोस्वामींनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिला डॉक्टरच्या अंगावर अनेक जखमा ( Kolkata Rape Case ) होत्या. त्यांचा हवाला देत गोस्वामी म्हणाले, “ज्या प्रकारे या महिलेच्या अंगावरच्या जखमा होत्या त्या पाहून वाटत नाही की हे एकट्याचं काम असेल. या घटनेत एकापेक्षा अधिक जणांचा सहभाग असू शकतो.” हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केल्यानंतर आता आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी हा आऱोप केला आहे की कोलकाता पोलिसांनी या प्रकरणातले पुरावे नष्ट करण्यासाठी कट रचला. एवढंच काय तर ज्या ठिकाणी गुन्हा घडला तो तिसरा मजलाही पोलिसांनी सील केला नाही.
पोलिसांनी सेमिनार हॉल सील का केला नाही?
पोलिसांनी ज्या ठिकाणी गुन्हा घडला तो सेमिनार हॉल सील का केला नाही? ९ ऑगस्टला या ठिकाणी ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात मिळाला होता. तरीही पोलिसांनी हा भाग सील केला नाही. सेमिनार हॉलमध्ये गाद्या, टेबल, बेंच, मशीन आणि लाकडी तसंच प्लास्टिक खुर्च्या दिसत आहेत. मात्र पोलिसांनी हा हॉल सील केलेला नाही असा आरोप आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी केला आहे. एवढंच नाही तर पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. असाही आरोप डॉक्टरांनी केला आहे.
0 Comments