पप्पा माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल..”; चिठ्ठी लिहित कल्याणच्या शाळकरी मुलाने आयुष्य संपवलं
कल्याण येथील आयडियल या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवल्याची घटना रविवारी घडली. आता त्याची भावनिक चिठ्ठी समोर आली आहे.
Kalyan Crime News : कल्याण पूर्व भागात असलेल्या आयडियल शाळेतील एका विद्यार्थ्याने रविवारी राहत्या घरी गळफास ( Kalyan Crime ) घेऊन आयुष्य संपवलं. शाळेतल्या एका शिक्षिकेकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याने हे पाऊल उचललं असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. विघ्नेश पात्रो असं या मुलाचं नाव आहे. तो अवघ्या बारा वर्षांचा होता. आत्महत्येपूर्वी ( Kalyan Crime ) एक चिठ्ठी विघ्नेशने लिहिली आहे. त्यामध्ये त्याने भावनिक ओळी लिहिल्या आहेत तसंच शिक्षिकेच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचंही म्हटलं आहे
0 Comments