-->

Ads

रस्त्यावर गाणी लावून डान्स... काही वेळातच गाडी ५०० फुट खोल दरीत! कास पठारनजीक एकाचा मृत्यू

Satara Accident : रस्त्यावर गाणी लावून डान्स... काही वेळातच गाडी ५०० फुट खोल दरीत! कास पठारनजीक एकाचा मृत्यू Video Viral


Satara Kas Pathar Accident : सर्व अपघातग्रस्त हे कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील असून त्यांना बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.


साताऱ्यातील कास पठार रस्त्यावर यवतेश्वर येथील गणेश खिंडीजवळ स्कॉर्पिओ गाडी ५०० फूट दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात सात जणांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकजणाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या गाडीमध्ये सात जण प्रवास करत होते. ज्यापैकी इतर पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त सर्वजण कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील आहेत.

अपघातापूर्वी तरुणांचा रस्त्यावर डान्स

दरम्यान फिरायला गेल्याल्या या सर्व तरुणांचा अपघातापूर्वीचा मौज करतानाचा, तसेच रस्त्यावर गाणी लावून डान्स करतानाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. मात्र त्यांचा आनंद फार काळ टिकू शकला नाही कारण या व्हिडीओनंतर या तरुणांवर काळाने घाला घातला आहे.

नेमकं काय झालं?

सायंकाळी एका मोटारीतून सात जण कासकडे निघाले होते. गणेश खिंड परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार चिखल व गवतावरून घसरत सुमारे ५०० फूट खोल दरीत कोसळली. त्यापैकी तिघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिस व शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सचे पथक तातडीने गणेश खिंड परिसरात दाखल केले. धुके व पावसात त्यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. अपघातग्रस्तांना बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.




Post a Comment

0 Comments