PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वीच जवानाच्या कृत्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; असा उघड झाला बनाव
PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यापूर्वीच एक मोठी अपडेट समोर येत आहे. त्यांच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका जवानामुळे ही गडबड झाली आहे. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
जवानाचा मोठा बनाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. त्याअनुषंगाने सुरक्षा यंत्राणांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही मुंबई पोलीस आणि एनएसजी अधिकार्यांची खासगी बैठक होती. या बैठकीला लष्कारातून सुट्टीवर आलेल्या एका जवानाने हजेरी लावण्याचा प्रयत्न केला. आपण एनएसजी अधिकारी असल्याचा बनाव त्याने केला.
लष्करातील जवानाचा बनाव उघड
गोरेगावच्या नेस्को येथे सुरक्षेच्या दृष्टीने ही बैठक घेण्यात आली. त्यावेळी लष्करातून सुट्टीवर आलेला रामेश्वर मिश्रा तिथे हजर झाला. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बैठकीत मिश्राने ब्लेजर, टाय अशी ड्रेसिंग करून लावली हजेरी लावली. आपण एनएसजी अधिकारी असल्याचा बनाव त्याने केला. पण त्याच्यावर अधिकाऱ्यांना संशय आला. त्याने ही बाब हेरली. त्याचवेळी त्याला पकडण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो फरार झाला होता.
यापूर्वी पण केला होता प्रकार
रामेश्वर मिश्राने हे कृत्य काही पहिल्यांदा केले नाही. त्याने यापूर्वी पण असाच प्रकार केला होता. प्रकरणात बैठकीतून निसटलेल्या मिश्राला वनराई पोलिसांनी अटक केली आहे. मिश्रा सध्या पोलीस कोठडीत आहे. गेल्यावर्षी पंतप्रधानांच्याच दौऱ्यात त्याने असाच बनाव केला होता. त्यावेळी पण त्याचा बनाव उघड झाला होता. गेल्यावेळी त्याला बीकेसी पोलिसांनी अटक केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या 13 जुलै रोजी मुंबईत येत आहेत. महापालिकेच्या काही प्रकल्पांचे भूमिपूजन ते करणार आहेत. तर मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव-मुलुंड या जोडरस्ता प्रकल्पातील जोड बोगद्याचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून हा बोगदा जाणार आहे.
0 Comments