-->

Ads

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी नवीन पद्धत, नव्या प्रणालीमुळे खाती उघडणे होणार सोपे

 

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी नवीन पद्धत, नव्या प्रणालीमुळे खाती उघडणे होणार सोपे

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण अ‍ॅपवर राज्यातील ४४ लाख बहिणींची नोंद आतापर्यंत झाली आहे. तसेच १० लाख अर्जांची आवेदने खात्यापर्यंत पोचली आहेत. लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना जुलैपासून १५०० रुपये देण्यात येणार आहे. त्यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.


Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरु करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राज्यात ठिकठिकाणी महिलांच्या रांगा लागल्या आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी येत्या राखी पौर्णिमेला महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहचणार असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी २.५ कोटी लाभार्थीचा डाटा कसा भरणार? हा मोठा प्रश्न होता. यासंदर्भातील सर्व्हर वारंवार ठप्प होण्याचे प्रकार घडत आहे. यामुळे आजपासून (१५ जुलै) शासनाने नवीन पद्धत तयार केली आहे. ‘यूआरएल’ पद्धतीने महिलांची खाती उघडली जाणार आहे.

काय आहे यूआरएल

यूआरएल म्हणजे युनिक रिसोर्स लोकेटर प्रणाली आहे. ज्या प्रमाणे आयकरदाते यूआरएलवर स्वत:चे खाते हाताळतात. त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला आपले खाते हाताळू शकणार आहे. राज्यभरातील महिलांना आपला संपूर्ण तपशील यूआरएल खात्यात भरता येणार आहे. यामुळे सर्व्हर ठप्प होण्याच्या तांत्रिक अडचणीवर पर्याय तयार होणार आहे.

अ‍ॅपवर ४४ लाख बहिणींची नोंद

लाडकी बहीण अ‍ॅपवर राज्यातील ४४ लाख बहिणींची नोंद आतापर्यंत झाली आहे. तसेच १० लाख अर्जांची आवेदने खात्यापर्यंत पोचली आहेत. लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना जुलैपासून १५०० रुपये देण्यात येणार आहे. त्यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.

अंगणवाडी सेविकेची होणार कमाई

लाडकी बहीण योजनेमुळे अंगणवाडी सेविकेची कमाई होणार आहे. त्यांना एका अर्जामागे ५० रुपये मानधन मिळणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची घोषणा केली. या योजनेत नाव नोंदवण्यासाठी ऑगस्ट अखेरपर्यंत मुदत आहे. सत्ताधारी आणि विरोधी सर्वच पक्षातील आमदार या योजनेत आपल्या भागातील महिलांची नावे भरुन घेत आहेत. काही आमदारांनी संगणक प्रणालीमार्फत पात्र महिलांच्या याद्या तयार केल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक स्वत: या योजनेवर लक्ष ठेवून आहेत. योजनेला राज्यभरातील महिलांकडून मोठा प्रतिसादही मिळाला आहे.

Post a Comment

0 Comments