-->

Ads

पुण्यानंतर मुंबईतही हिट अँड रन; ऑडीची दोन रिक्षांना जबरदस्त धडक, रिक्षा चालक गंभीर

 पुण्यातील पोर्शे हिट अँड रन प्रकरण ताजं असताना मुंबईतील मुलुंडमध्ये हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


मुंबई:

पुण्यातील पोर्शे हिट अँड रन प्रकरण ताजं असताना मुंबईतील मुलुंडमध्ये हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका ऑडी कारने दोन ऑटो रिक्षाला धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलुंडमध्ये झालेल्या या हिट अँड रन प्रकरणात दोन्ही रिक्षा चालक आणि दोन प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी एका रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर आहे. दोन्ही रिक्षांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्याम हा अपघात करणारा ऑडी चालक फरार झाला असून मुलुंड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.  

बातमी अपडेट होत आहे. 


Post a Comment

0 Comments