अंबरनाथ
शहरातील रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, ज्यामुळे नागरिकांना अपघातांचे व वाहतूक कोंडीचे अनेक समस्या निर्माण होत आहेत. यामध्ये अनेक बाईकस्वार व रिक्षांचे अपघात झाले आहेत. हे लक्षात घेता शिवसेना शहरप्रमुख श्री. अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना निरीक्षक कल्याण भिवंडी लोकसभा अँड. निखिल वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज, दिनांक २२ जुलै २०२४ रोजी युवासेना तर्फे अंबरनाथ नगरपालिका प्रशासन यांना पत्र देण्यात आले.
युवासेनेने पत्रामध्ये सूचित केले आहे की येत्या ७ दिवसात जर हे खड्डे नगरपालिकेतर्फे भरण्यात आले नाहीत तर युवासेना स्व:खर्चाने रस्त्यावरील वाहतूक रोखून हे खड्डे भरण्यात येतील. यासाठी संपूर्ण जबाबदारी अंबरनाथ नगरपरिषद मुख्याधिकारी व अंबरनाथ नगरपरिषद प्रशासनाची असेल.
या आंदोलनाच्या वेळी कल्याण लोकसभा युवासेना समन्वयक श्री. स्वप्निल जाविर, शहर अध्यक्ष श्री. स्वप्निल भामरे, अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष श्री. गणेश आयवळे, उपविभाग प्रमुख श्री. अमोल वाझे, उपशहर अध्यक्ष श्री. देव यादव, श्री. वैभव शितोळे, श्री. प्रविण शितोळे, सचिव कु. वैभव डावरे, कु. आकाश चलवादी, युवतीसेनेच्या कु. स्नेहल कांबळे व कार्यकर्ते उपस्थित होते.
युवासेनेचे हे ठाम पाऊल अंबरनाथमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. नगरपालिकेने त्वरित उपाययोजना करावी अशी नागरिकांचीही अपेक्षा आहे.
0 Comments