-->

Ads

उरणमध्ये प्रेमसंबंधातून एका तरुणीची निर्घृण हत्या; "लव्ह जिहाद" चा संशय व्यक्त

उरणमध्ये प्रेमसंबंधातून एका तरुणीची निर्घृण हत्या; "लव्ह जिहाद" चा संशय व्यक्त

## संपूर्ण बातमी:
उरणमध्ये प्रेमसंबंधातून एका वीस वर्षांच्या तरुणीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 



स्थानिक पुढाऱ्यांनी हे "लव्ह जिहाद" प्रकरण असल्याचा संशय व्यक्त केला आहे. यशस्वी शिंदे असे त्या तरुणीचे नाव असून, अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी तिच्या गुप्तांगावर वार करून तिचे शरीराचे अवयव कापले आणि चेहऱ्याचा चेंदामेंदा केला. तिचा मृतदेह झुडपात फेकून दिला. प्रथम दर्शनी यशस्वीचा मृतदेह पाहणाऱ्या लोकांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला होता. इतक्या कोवळ्या वयात यशस्वीसोबत नेमके काय घडले, हे जाणून घेण्यासाठी तपास सुरू आहे. 

विशेष पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल 27 जुलै रोजी दुपारी उरण-पनवेल महामार्गावरील उरण पेट्रोल पंपाजवळील झुडपात एक मृतदेह आढळून आला. त्या मृतदेहाचे हातपाय कापलेले होते, तिच्या सर्वांगावर चाकूचे वार केलेले होते, आणि चेहऱ्याचा चेंदामेंदा करण्यात आलेला होता. हे दृश्य पाहून लोकांचा थरकाप झाला होता. पोलिसांना खबर मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मागील दिवसातील काही मिसिंग कम्प्लेंट तपासल्या. नंतर त्यांना 25 जुलै रोजी यशस्वी शिंदे नावाची तरुणी गायब झाल्याची कम्प्लेंट रजिस्टर झाल्याची माहिती मिळाली. पोस्टमार्टम रिपोर्ट आणि FIR मध्ये नोंद असलेल्या वर्णनावरून तो मृतदेह यशस्वीचा असल्याची खात्री झाली. 

यशस्वीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, यशस्वी शिंदे आणि तिचे कुटुंब उरणच्या प्रतीक अपार्टमेंटमध्ये राहत होते. यशस्वी नुकतीच नवी मुंबईतील एका खाजगी कंपनीत कामावर लागली होती. पण ती 14-15 वर्षांची असताना, 2019 मध्ये, दाऊद शेख नावाचा तरुण तिला त्रास द्यायचा. त्यावेळी तिच्याशी गैरवर्तन करून तिला ठार मारण्याची धमकी दिल्याने यशस्वी आणि तिच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर फॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला होता. 

पोलिसांनी दाऊद शेखला अटक करून तुरुंगात पाठवले होते. पण त्याच्या मनात यशस्वी आणि तिच्या कुटुंबाबद्दल चीड निर्माण झाली होती. तो रात्रंदिवस यशस्वीचा बदला घेण्याचा विचार करत होता. जामिनावर सुटल्यावर, त्याने यशस्वीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी योजना बनवली. 

२५ जुलै 2024 रोजी यशस्वी पनवेल स्टेशनच्या दिशेने गेली होती. तिचा फोन अचानक बंद पडल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. तिच्या फोन रेकॉर्ड तपासण्यात आले, ज्यातून कळाले की यशस्वी एका विशिष्ट नंबरवर सातत्याने बोलायची. 

त्या नंबरची अधिक माहिती घेतल्यावर तो नंबर दाऊद शेखचाच असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ तपासाची दिशा बदलली आणि दाऊदला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरून अटक केली. 

उरणकरांनी बाजारपेठा बंद ठेवून निषेध नोंदवला आणि आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. सदर तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले आहेत. संबंधित घटनेबद्दल तुमचं मत काय आहे, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

Post a Comment

0 Comments