पुण्यात पुराचा धोका, राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
गेल्या दोन दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्यातही पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असून भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, ...
Maharashtra Rain Live Updates:गेल्या दोन दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्यातही पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असून भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती आहे. यामुळे नदीच्या बाजूला असणाऱ्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. राधानगरी धरणातील पाणी पातळीही वाढली आहे, त्यामुळे कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडू शकतात. तर दुसरीकडे चांदोली धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
0 Comments