-->

Ads

छत्तीसगडच्या बस्तरमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद नेमकं काय घडलं?

 

Naxal IED Blast: छत्तीसगडच्या बस्तरमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद; नेमकं काय घडलं? जाणून घ्या

गेल्या काही दिवसांत नक्षलवाद्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.


बस्तर : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटकांचा स्फोट होऊन त्यात सहा जवान गंभीर जखमी झाले, यांपैकी दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. बस्तर पोलिसांनी या घटनेला पुष्टी दिली असून नक्षलविरोधी पथक गस्तीवर असताना हा प्रकार घडला.
बिजापूरचे पोलीस आधीक्षक जितेंद्र यादव यांच्या माहितीनुसार, सत्येंद्र सिंह आणि भरत साहू हे दोन जवान या स्फोटात शहीद झाले आहेत. बिजापूर जिल्ह्यातील भागात शोध मोहिम राबवून आपल्या ठाण्याकडं परतत असताना जमिनीत पेरुन ठेवलेल्या स्फोटकांशी या जवानांचा संपर्क आला आणि त्यामुळं झालेल्या भीषण स्फोटात अनेक जवान अडकले. त्यांना हेलिकॉप्टरने रायपूर इथं उपचारासाठी नेण्यात आलं आहे.
दरम्यान, गडचिरोलीत पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकानं कारवाई करत नुकतंच 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. त्यानंतर आज छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षादलांवर हा हल्ला घडवून आणला.

Post a Comment

0 Comments