-->

Ads

सगळं खरं पण... रोहित अन् विराट टीम इंडियासाठी पुढचा सामना कधी अन् कुठे खेळणार? जाणून घ्या एका क्लिकवर

या विजयाच्या आनंदासोबतच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना धक्काही दिला.



Rohit Sharma Virat Kohli Next Match For India : टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून 17 वर्षांनंतर या फॉरमॅटमध्ये विजेतेपद पटकावले. मात्र, या विजयाच्या आनंदासोबतच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना धक्काही दिला. आता हे दोन्ही दिग्गज भारताकडून एकही टी-20 सामना खेळणार नाहीत. अशा स्थितीत विराट आणि रोहित भारताकडून पुढचा सामना कधी खेळणार, असा प्रश्न बहुतांश चाहत्यांच्या मनात असेल.

विराट कोहली आणि रोहित शर्मा आता वनडे आणि टेस्ट फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहेत. या महिन्यात भारताला श्रीलंकेचा दौरा करायचा आहे. जिथे दोन्ही देशांदरम्यान 3 वनडे सामन्यांची अनधिकृत मालिका खेळली जाईल. या मालिकेसाठी विराट आणि रोहितसारख्या अनुभवी खेळाडूंची संघात निवड होणे कठीण आहे. या मालिकेसाठीही बीसीसीआय युवा खेळाडूंना संधी देईल, अशी आशा आहे.

यानंतर भारतीय संघ सप्टेंबरमध्ये बांगलादेशचा दौरा करणार आहे. तेथे, दोन्ही देशांच्या आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल. मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे.


या मालिकेद्वारे रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा संघात परतणार असून, कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा दावा मजबूत करण्यासाठी टीम इंडिया हे दोन्ही सामने जिंकण्याच्या इराद्याने रोहितच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे.

या वर्षी टीम इंडिया आणखी किती सामने खेळणार?

टीम इंडिया जुलै ते डिसेंबर अखेरपर्यंत 17 सामने (8 टी-20, 9 कसोटी) खेळणार आहे. यामध्ये श्रीलंकेविरुद्धच्या 3-3 सामन्यांच्या टी-20 आणि वनडे मालिकेचा समावेश नाही.


Post a Comment

0 Comments