-->

Ads

Ambadas Danve : निलंबन मागे घेताच दानवेंनी उघड केला मोठा घोटाळा; नागपूरमध्ये शेतकऱ्यांचे ३४ कोटी कुणी खाल्ले?

Ambadas Danve : निलंबन मागे घेताच दानवेंनी उघड केला मोठा घोटाळा; नागपूरमध्ये शेतकऱ्यांचे ३४ कोटी कुणी खाल्ले?


Opposition Leader : ''माझ्यावर अन्याय केलेला आहे, विरोधी पक्षनेत्याविना सभागृह चालवणे चुकीचं आहे. मलाच जबाबदार धरलं गेलं आणि कारवाई केली. जसा पूल कोसळला तसं हे सरकार हे कोसळेल, जी काही विकासाची कामं सुरुयत, ती स्वत:ला समृद्ध करण्यासाठी आहेत.''


Winter Session 2024 :
 विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबनातून सूट दिल्यानंतर शुक्रवारी ते विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी झाले आहेत. सभागृहात जाण्यापूर्वी यांनी नागपूरमध्ये झालेल्या एका घोटाळ्याला वाचा फोडली.

अंबादास दानवे म्हणाले की, मी तीन दिवसांच्या गॅपनंतर पुन्हा आलो आहे. काल एक घटना नागपूरची समोर आलीय. यामध्ये तब्बल १४ हजार शेतकऱ्यांचा सातबारा वापरला आणि नाव बदलून १४ हजार शेतकऱ्यांच्या नावावरील नुकसान भरपाई तलाठी आणि अधिकाऱ्यांनी लुबाडली. ही रक्कम ३४ कोटी रुपये असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं.

दानवे पुढे म्हणाले की, तलाठ्यापासून ते तहसीलदारांपर्यंत सगळेच या अपहारामध्ये सहभागी आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरावून घेण्याचं पाप केलं जात आहे. विशेष म्हणजे फडणवीस, बावनकुळे आणि गडकरी असूनही अशा घटना घडत आहेत. त्यामुळे सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय, असं दानवे म्हणाले.

स्वतःवरील कारवाईवरुन बोलताना दानवे म्हणाले की, माझ्यावर अन्याय केलेला आहे, विरोधी पक्षनेत्याविना सभागृह चालवणे चुकीचं आहे. मलाच जबाबदार धरलं गेलं आणि कारवाई केली. जसा पूल कोसळला तसं हे सरकार हे कोसळेल, जी काही विकासाची कामं सुरुयत, ती स्वत:ला समृद्ध करण्यासाठी आहेत, असा आरोप त्यांनी सत्तापक्षावर ठेवला.





Post a Comment

0 Comments