HSC Exam Update: पावसामुळे आज 12 वीची परीक्षा चुकली? नो टेंशन, पुन्हा परीक्षा देता येणार; शिक्षणमंत्र्यांनी केलं जाहीर
रायगड, ठाणे, पुण्यात शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबईच्या शाळेबाबत पालिका आयुक्त निर्णय घेत असतात. पाणी जास्त साचलं तरी तसा निर्णय घेतला जाईल, असं केसरकरांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
काही विद्यार्थ्यांची परीक्षा असल्याने पावसामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. अनेकांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास अडचण येत होती. अनेकजण उशिरा परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची शक्यता होती. याची दखल शिक्षण मंत्र्यांकडून घेण्यात आली आहे. त्यांनी उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील परीक्षा केंद्रात बसू देण्याची सवलत दिली आहे. तसेच जे परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांना एक संधी दिली जाईल.
पुण्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक भागात कंबरे इतके पाणी साचलं आहे. सिंहगड रोड परिसराला तर तळ्याचे स्वरूप आले आहे. बोटी घेऊन एनडीआरएफची टीम नागरिकांना वाचवण्याचे काम करत आहे. सोसायटी आणि घरांमध्ये पाणी साचलं आहे. याच पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय कालच जाहीर करण्यात आला होता. आज जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी ऑफिसला देखील सुट्टी जाहीर केली आहे
पुण्यात विक्रमी पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. अनेक दुर्दैवी घटना देखील घडल्या आहेत. डेक्कन जिमखाना येथे टपरी हलवताना विजेचा करंट लागून तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. ताम्हिणी घाटामध्ये दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.
0 Comments