भारतीय शेअर बाजार 10 जून, सोमवारी एका नव्या शिखरावर पोहोचला आहे. शेअर बाजाराची सुरुवात होताच सेन्सेक्स आणि निफ्टीने मोठी उसळी घेतली.
भारतीय शेअर बाजार 10 जून, सोमवारी एका नव्या शिखरावर पोहोचला आहे. शेअर बाजाराची सुरुवात होताच सेन्सेक्स आणि निफ्टीने मोठी उसळी घेतली. सेन्सेक्स 373.15 अंकावर 0.49 टक्क्यांच्या जबरदस्त उसळीसह 77,066.51 वर आणि निफ्टी 115.40 अंकावर 0.50 टक्के वाढला आणि 23,405.60 वर व्यवहार करीत आहेत. पहिल्यांदाच सेन्सेक्स 77000 च्या पातळीच्या पुढे गेला आहे.
यासोबतच अदाणी ग्रुपच्या सर्व शेअर्समध्येही आज मोठी तेजी पाहायला मिळत आहे. अदाणी पॉवरच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 4.36 टक्क्यांची उसळी पाहायला मिळत आहे. त्यामुळे अदाणी समूहाच्या सर्व यादींमधील कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 17.5 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.
सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टीमध्ये सर्वाधिक फायदा झालेल्या शेअर्समध्ये अदाणी पोर्ट्स, पॉवर ग्रीड कॉर्प, कोल इंडिया, बजाज ऑटो आणि श्रीराम फायनेन्स यांचा समावेश आहे. तर टेक महिंद्रा, इन्फोसिस, डॉ. रेड्डीज लँब्ज, एलटीआयमाइंडट्री आणि हिंडाल्को यांचा समावेश सर्वाधिक तोट्यांमध्ये आहे. तर आयटी आणि मेटल व्यतिरिक्त बाकी सर्व सेक्टोरेल इंडेक्स हिरव्या निशाणात व्यवहार करीत आहेत. पीएसयू बँक आणि ऑटो शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे.
0 Comments