पिले.. पिलेSS.. ओ मेरे राजा ! एकाच शहरातील दारु दुकानांचा लिलाव; सरकारने कमावले 1 हजार 756 कोटी
राज्याच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणानुसार गुरुग्राम शहरातल्या पूर्व आणि पश्चिम विभागामध्ये १६२ दुकानांसाठी बुधवारी ऑनलाईन निविदा प्रक्रिया पार पडली. ऑनलाईन पद्धतीने उघडण्यात आलेल्या निविदांमध्ये ही आश्चर्याची बाब समोर आली.
Liquor Case News : दारु दुकानांच्या लिलावामधून केवळ एका शहरामध्ये राज्य सरकारला १ हजार ७५६ कोटी रुपये मिळाले आहे. दिवसेंदिवस दारु पिणाऱ्यांची वाढणारी संख्या आणि त्यातून व्यवसायाची निर्माण झालेली स्पर्धा अधोरेखित होतेय.
दारु दुकानांच्या लिलावातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसे जमा झाल्याचा प्रकार हरियाणातल्या गुरुग्राममध्ये घडला आहे. शहरातल्या पूर्व आणि पश्चिम झोनमधील १६२ दारु दुकानांच्या लिलावामधून सरकारला १ हजार ७५६ कोटी रुपये मिळाले आहेत. एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने 'डीएनए'ने हे वृत्त दिले आहे.
राज्याच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणानुसार गुरुग्राम शहरातल्या पूर्व आणि पश्चिम विभागामध्ये १६२ दुकानांसाठी बुधवारी ऑनलाईन निविदा प्रक्रिया पार पडली. ऑनलाईन पद्धतीने उघडण्यात आलेल्या निविदांमध्ये ही आश्चर्याची बाब समोर आली.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शहराच्या पूर्व भागात एकूण ६९ सेक्टर आहेत. एका झोनमध्ये चार दारुची दुकाने व्यापारी सुरु करु शकतात. शहरात सध्या ३४२ दारुची दुकाने आहेत. उत्पादन शुल्क विभाग हा पूर्व आणि पश्चिम विभागामध्ये विभागला गेलेला आहे.
पूर्व विभागातील गोल्फ कोर्स रोडवरील वाईन शॉपला सर्वाधिक ५०.५७ कोटी रुपयांची बोली लागली तर ब्रिस्टल चौकाजवळील दुसऱ्या एका दारुच्या दुकानाला ४८.२८ कोटी रुपयांची बोली लागली. आणखी पश्चिमेकडील दोन झोन आणि पूर्वेकडी २० झोनचे लिलाव बाकी आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये १४ जून रोजी ते लिलाव पार पडतील.
0 Comments