-->

Ads

मंत्रि‍पदाचा राजीनामा दिलेला, आमदारकीचं काय घेऊन बसलाय; भुजबळांनी जरांगेंना डिवचले

 

मंत्रि‍पदाचा राजीनामा दिलेला, आमदारकीचं काय घेऊन बसलाय; भुजबळांनी जरांगेंना डिवचले

राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलीच जुंपली आहे. दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला आहे. तर, भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांचा हा इशारा उडवून लावला आहे.


छगन भुजबळ यांचं करिअर उद्ध्वस्त करू. त्यांनी आमच्या वाटेला जाऊ नये, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून दिला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांचा हा इशारा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी उडवून लावला आहे. मी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला होता. आमदारकीचं काय घेऊन बसलाय?, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांचा इशारा उडवून लावला आहे. तर दुसरीकडे पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी भुजबळांना सोडणार नसल्याचं म्हटलं आहे.

छगन भुजबळ हे थोड्यावेळात संभाजीनगरला जाणार आहे. संभाजीनगरमध्ये ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना उपोषण सोडण्याची विनंती भुजबळ करणार आहेत. तसेच काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीची माहितीही भुजबळ या दोन्ही नेत्यांना देणार आहेत. त्यापूर्वी भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधला.

हाके आणि वाघमारे यांचे ब्लड प्रेशर अपडाऊन होत आहे. ऑक्सिजनमध्ये कमतरता होत आहे. काल मुख्यमंत्र्यांनी अर्जंट बैठक घेतली. सर्व पक्षाचे लोक उपस्थित होते. मंत्री, ओबीसी नेते उपस्थित होते. त्या बैठकीत काय घडलं? त्याचा तपशील मी तुम्हाला कालच दिला आहे. त्यामुळे हाके आणि वाघमारे यांनी आज उपोषण सोडावं म्हणून मी संभाजीनगरला जात आहे. मग येताना पुण्याला जाऊन मंगेश ससाणे यांचं उपोषण सोडवणार आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

कारवाई होणारच

कुणबी प्रमाणपत्रच नाही तर इतर कोणत्याही प्रमाणपत्रांबद्दल ज्या ज्या काही तक्रारी येतील, त्याची चौकशी केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सांगितलं आहे. कोणतंही प्रमाणपत्रं असो… चुकीचं प्रमाणपत्र देणारा आणि घेणारा गुन्हेगार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी कालच स्पष्ट केलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मग अडचण काय आहे?

मराठ्यांवर अन्याय करा असं आम्ही म्हटलं नाही. त्यांना सेपरेट आरक्षण द्या असं सांगितलं. सारथीच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना सर्वाधिक सुविधा आहेत. आमचा त्याला विरोध नाही. आणखी काय पाहिजे? घरेही सरकार देत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आहे. कर्ज माफीच्या योजना आणत आहोत. विद्यार्थ्यांची फी देत आहोत. शहरात शिकणाऱ्यांना वसतिगृह देणं, वसतिगृहाची सुविधा देता येत नसेल तर 60 हजार रुपये देणं या गोष्टी सरकार सर्वांसाठी करत आहे. मग अडचण काय आहे?, असा सवाल भुजबळ यांनी केला.

तर रस्त्यावर येऊ

तुमचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मी मंत्रीपदाचाही राजीनामा दिला होता. तिथे आमदारकीचं काय घेऊन बसलाय? माझं करीअर चालवणं किंवा संपवणं हे पक्षाच्या हातात आहे. आणि जनतेच्या हातात आहे. जनतेचं कोर्ट सर्वश्रेष्ठ आहे. त्यांना जर 9 मंत्र्‍यांना घरी बसवायचं तर बसवा. भुजबळांना घरी बसवलं तर भुजबळ ओबीसांचा मुद्दा रस्त्यावर येऊन मांडेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Post a Comment

0 Comments