-->

Ads

दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच

 

Vidhan Parishad Election 2024: दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच


Maharashtra Politics: भाजपच्या दिल्लीतील बैठकीत विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या नावांची चर्चा. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही येत्या काही दिवसांमध्ये पार पडू शकतो, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.


नवी दिल्ली: राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणूक आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी रात्री दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. या बैठकीत विधानपरिषदेच्या जागांवरील (VidhanParishad Election 2024) उमेदवारांबाबत चर्चा झाली. राज्यातील विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला निवडणूक होणार आहे. भाजप (BJP) पाच जागांवर उमेदवार उभे करणार आहे. मात्र, यासाठी भाजपमधील 35 जण इच्छूक उमेदवार आहेत. त्यामुळे कोणत्या उमेदवारांची निवड करायची, हा पेच भाजप नेतृ्त्त्वासमोर आहे. यादृष्टीने दिल्लीतील बैठकीत फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. 

विधानपरिषदेच्या उमेदवारांची निवड करताना भाजपकडून काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो किंवा जे उमेदवार विधानसभेला प्रभाव टाकू शकतात,  अशांनाच भाजपकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

येत्या दोन ते तीन दिवसांत भाजप आपल्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेसोबतच मंत्रिमंडळ विस्तारावर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील अचानक दिल्लीत पोहोचले होते. दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची गुप्तपणे भेट घेतल्याचे सांगितले जाते. उभय नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.  

राज्यात येत्या दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार

महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दिल्लीवारीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग आला आहे. महायुती सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तार करताना चांगली कामगिरी न केलेल्या मंत्र्यांना डच्चूही दिला जाऊ शकतो. तर भाजपकडून तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यावेळी शिंदे  गट आणि अजितदादा गटाकडून कोणत्या आमदारांना मंत्रीपदाची संधी दिली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याशिवाय,गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्त्याही यावेळी केल्या जातील, अशी चर्चा आहे.

नरेंद्र पाटलांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची मागणी

माथाडी नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना विधानपरिषद सदस्य म्हणून घेण्यासाठी माथाडी कामगारांचा आग्रह. त्यासाठी माथाडी कामगारांचे शिष्टमंडळ आज सकाळी ११ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. 

Post a Comment

0 Comments