-->

Ads

पंकजाताई, भुजबळसाहेब, आम्हाला आरक्षण मिळू द्या ही विनंती...', मराठा आरक्षणासाठी चिठ्ठी लिहून बार्शीच्या युवकाने संपविले जीवन

पंकजाताई, भुजबळसाहेब, आम्हाला आरक्षण मिळू द्या ही विनंती...', मराठा आरक्षणासाठी चिठ्ठी लिहून बार्शीच्या युवकाने संपविले जीवन


Maratha Reservation: पुण्यामध्ये खाजगी कंपनीत काम करणारे बार्शीतील युवक शंभुभक्त प्रसाद देठे यांनी मराठा आरक्षणासाठी लाईव्ह व्हिडिओ करून व चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी उपोषण सुरू केलं आहे. तर दुसरीकडे आरक्षण मिळण्यासाठी तरूणांच्या आत्महत्या सुरूच आहेत. पुण्यामध्ये खाजगी कंपनीत काम करणारे बार्शीतील युवक शंभुभक्त प्रसाद देठे यांनी मराठा आरक्षणासाठी लाईव्ह व्हिडिओ करून व चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ही घटना आज सकाळी उघडकीस आली असून देठे यांच्या जाण्याने सामाजिक व सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून हळहळ व्यक्त होत आहे.लिहिलेल्या चिठ्ठीत फक्त मराठा आरक्षण मिळावे यासाठी आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्याला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख त्यांनी केला आहे. देठे यांना पत्नी, २ मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्तापर्यंत अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. तर मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देऊ अशी टोकांची पावले उचलू नका असं आवाहन केलं होतं. त्यानंतरही आत्महत्यांचं सत्र सुरूच असल्याचं चित्र दिसून येत आहे.

आत्महत्येपुर्वी चिठ्ठीमध्ये काय लिहलंय?

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजा ताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी.पी.मुंडे गायकवाड, आम्हाला आरक्षण मिळू द्या. ही विनंती आहे तुम्हाला. हात थरथर कापतोय म्हणून असं अक्षर आलं आहे. माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. मी स्वखूशीने मरत आहे. जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. ही माझी तुम्हाला विनंती आहे. मी पुर्णपणे हताश झालो आहे. चिऊ मला माफ कर, लेकरांची काळजी घे. धीट राहा. मला माफ करा.

Post a Comment

0 Comments