-->

Ads

वाळू तस्करांची शिरजोरी सुरूच! दिवसाढवळ्या भर रस्त्यात चक्क तलाठ्यासह कोतवालला मारहाण

 

Yavatmal Crime News : वाळू तस्करांची शिरजोरी सुरूच! दिवसाढवळ्या भर रस्त्यात चक्क तलाठ्यासह कोतवालला मारहाण 

Yavatmal Crime News : वाळू तस्करांच्या शिरजोरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात रेती तस्करांनी भरदिवसा रस्त्यावर चक्क तलाठ्यासह कोतवालला मारहाण (Yavatmal) केल्याची घटना समोर आला आहे.



















Yavatmal Crime News यवतमाळ :  वाळू तस्करांच्या (Sand smuggler) शिरजोरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात रेती तस्करांनी भरदिवसा रस्त्यावर चक्क तलाठ्यासह कोतवालला मारहाण (Yavatmal Crime) केल्याची घटना समोर आला आहे. ही घटना यवतमाळच्या (Yavatmal News) दिग्रस तालुक्यात घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ सध्या समाज मध्यमांवर प्रसारित होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून या वाळू तस्करांच्या शिरजोरीला कोणी आळा घालणार आहे की नाही, असा प्रश्न या निमित्याने उपस्थित केला जात आहे. 

भर रस्त्यात चक्क तलाठ्यासह कोतवालाला मारहाण 

रेती घाट बंद असल्याने रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांकडून काही रेती तस्करांना खुली सुट, तर काही रेती तस्करांवर कारवाई करीत आहे. त्यामुळे दिग्रस येथील चिडलेल्या काही रेती तस्करांकडून तलाठी जयंत प्रकाश व्यवहारे आणि  कोतवाल यांना भर रस्त्यावर मारहाण करण्यात आली. ही घटना शहरातील गांधीनगर येथे घडली. यात रेती तस्कर आणि तलाठी जयंत प्रकाश व्यवहारे आणि  कोतवाल यांच्यात चांगलीच झटापट झाली.

हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल 

यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील गांधीनगर जवळ अरुणावती नदी असून त्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैद्य रेती उपसा सुरू आहे.  ट्रॅक्टर तसेच छोट्या वाहनांच्या साह्यानी रेती तस्करी सुरू असताना या  तलाठी आणि कोतवाल फिरस्ती दरम्यान रेती चोरट्यात चांगलीच झुंपली. रेतीने भरलेले दुसरे ट्रॅक्टर का सोडले आणि माझेच वाहन का पकडले, असा वाद होऊन या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी वाळू तस्करांनी जिवाणीशी मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर भयभीत झालेल्या जयंत प्रकाश व्यवहारे यांनी दिग्रस पोलीस स्टेशन गाठत संबंधित मारेकऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरुन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे दिग्रस पोलिसांनी  यातील संशयित आरोपी शेख मोबीन, लकी मतीन शेख, गोलू मतीन शेख (रा. आंबेडकर नगर ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. तर पुढील तपास सध्या पोलीस करत आहे. मात्र या घटनेमुळे वाळू तस्करांच्या शिरजोरीची आणखी एक घटना जिल्ह्यात घडली आहे

Post a Comment

0 Comments