-->

Ads

सांगली लोकसभेत माझ्याबाबत समज-गैरसमज पसरले, पण आम्ही आघाडी धर्म पाळला; जयंत पाटलांनी मौन सोडलं


 

सांगली लोकसभेत माझ्याबाबत समज-गैरसमज पसरले, पण आम्ही आघाडी धर्म पाळला; जयंत पाटलांनी मौन सोडलं

Sangali News: सांगलीत आम्ही आघाडी धर्म पाळला, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे. वेगळी कृती केली असती, तर काँग्रेस-शिवसेना दुखावली गेली असती, असंही ते म्हणाले आहेत.





Sangali Lok Sabha Election 2024: सांगली : राज्यातील (Maharashtra News) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) निकालानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. राज्यात मतदार राजानं महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aaghadi) बाजूनं कौल दिला. अशातच लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपासूनच सांगली मतदारसंघ मोठा चर्चेत होता. सांगलीवरुन (Sangali) महाविकास आघाडीमधली धुसफुस समोर आली होती. ठाकरेंनी चर्चा सुरू असतानाही परस्पर सांगलीच्या जागेवर उमेदवाराची घोषणा केली. त्यावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात मिठाचा खडा पडल्याचं पाहायला मिळालं होतं. पण याच सांगलीचा तिढा वाढण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या नावाची चर्चा होती. सांगलीतील तिढा वाढवण्यासाठी जयंत पाटील कारणीभूत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता याच चर्चांवर खुद्द जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सांगलीत आम्ही आघाडी धर्म पाळला, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, "शरद पवार यांच्या प्रभावामुळे गेम पलटला आणि लोकसभेत राष्ट्रवादीला चांगले यश मिळालं. सांगली लोकसभेत काही गोष्टींवरून माझ्याबाबत समज-गैरसमज पसरत गेले. पण, सांगलीत आम्ही आघाडीचा धर्म पाळला. वेगळी कृती केली असती, तर काँग्रेस-शिवसेना दुखावली गेली असती."

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं मोठं यश मिळवलं. त्यातल्या त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं फारच कमी जागा लढल्या, पण जास्त जागांवर यश मिळवलं. शदर पवारांनी 10 जागा लढवल्या आणि त्यापैकी 8 जागांवर दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे संपूर्ण राज्यभर शरद पवारांचाच बोलबाला पाहायला मिळाला. अशातच  

 सांगलीतल जयंत पाटलांचं भव्य स्वागत 

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर जयंत पाटील गुरुवारी पहिल्यांदाच इस्लामपूरला आले होते. वाळवा तालुका, इस्लामपूर आणि आष्टा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्वागताचे आणि सत्कार समारंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जयंत पाटील यांचं भव्य स्वागत आणि सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जेसीबीनं फुलांचा वर्षाव करण्यात आला. जयंत पाटील यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतील अनेक गोष्टी भाषणात बोलून दाखवल्या.

Post a Comment

0 Comments