-->

Ads

अर्जुन कपूरची बर्थडे पार्टीतून गायब मलायका अरोरा, 5 वर्षांनंतर ब्रेकअप? चर्चांना उधाण

 

अर्जुन कपूरची बर्थडे पार्टीतून गायब मलायका अरोरा, 5 वर्षांनंतर ब्रेकअप? चर्चांना उधाण


Malaika Arora - Arjun Kapoor : स्वतःच्या बर्थडे पार्टीला मलायका अरोराला अर्जुन बोलावलं नाही? 5 वर्ष डेट केल्यानंतर ब्रेकअपच्या चर्चा..., अभिनेत्याच्या बर्थडे पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी लावली हजेरी, पण मलायकाने फिरवली पाठ... चर्चांना उधाण...



अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळेअ अधिक चर्चेत असतो. आज अर्जुन कपूर याचा वाढदिवस आहे. आज अर्जुन 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. बुधवारी वाढदिवस असल्यामुळे मंगळवारी अभिनेत्याच्या घरी पार्टी ठेवण्यात आली होती. वांद्रे येथील राहात्या घरी अर्जुन कपूर याच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अभिनेत्याने कुटुंबिय आणि मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी अभिनेत्याच्या घरी पोहोचले होते. पण अभिनेत्री मलायका अरोरा मात्र पार्टीतून गायब होती.

अर्जुन कपूर याच्या वाढदिवसासाठी ठेवण्यात आलेल्या पार्टीमध्ये मलायका दिसली नसल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आता पुन्हा मलायका आणि अर्जुन यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मलायका – अर्जुन यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. पण यावर दोघांनी देखील अधिकृत घोषणा केलेली नाही.

अर्जुन कपूर याच्या बर्थडे पार्टीमध्ये जान्हवी कपूर, शनाया कपूर, मेहित मारवाह, संजय कपूर, माहीप कपूर यांसारखे अनेक सेलिब्रिटी उपस्थिती होते. अर्जुन कपूर याचा खास मित्र आणि अभिनेता वरुण धवन देखील पत्नी नताशा हिच्यासोबत पोहोचला होता. तर आदित्य रॉय कपूर देखील पार्टीमध्ये होता.

मलायका अरोरा – अर्जुन कपूर

अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत आनंदाने आयुष्य जगत होती. पण आता अर्जुन आणि मलायका यांचे मार्ग देखील वेगळे झाल्याची माहिती मिळत आहे. 2019 मध्ये मलायका – अर्जुन यांनी सर्वांसमोर नात्याची घोषणा केली.

दोघांनी नात्याची घोषणा केल्यानंतर अनेकांनी दोघांचा विरोध देखील केला. पण अर्जुन – मलायका यांनी होत असलेल्या विरोधाकडे लक्ष न देता फक्त त्यांच्या भावनांना महत्त्व दिलं. पण आता 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अर्जुन – मलायका यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे

Post a Comment

0 Comments