IPL 2024, MI vs LSG : आयपीएलच्या सतराव्या हंगामात मुंबई इंडियन्सचा शेवटही कडू झालाय. शेवटच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सला 14 सामन्यांपैकी तब्बल 10 सामन्यात पराभव पत्करावा लागला.
IPL 2024, MI vs LSG : आयपीएलचा सतरावा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) अत्यंत निराशाजनक ठरला. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईचा यंदाच्या हंगामातला शेवटही कडू झाला. शेवटच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सला 14 सामन्यांपैकी तब्बल 10 सामन्यात पराभव पत्करावा लागला. कागदावर बलाढ्य असणाऱ्या मुंबईला केवळ 4 सामने जिंकता आले. इतकंच काय तर आयपीएल पॉईंटटेबलमध्येही (IPL Point Table) मुंबई इंडियन्स शेवटच्या म्हणजे दहाव्या क्रमांकावर होती.
आयपीएलच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदावरुन हटवलं आणि मुंबईची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवली. पण नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मुंबईला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
रोहितचा मुंबईसाठी शेवटचा सामना?
लखनऊविरुद्ध घरच्या मैदानावर झालेला पराभव मुंबई इंडियन्सच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. यादरम्यान सामन्यानंतर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची मालकीण नीता अंबानी यांच्याशी चर्चा करताना दिसला. रोहित शर्मा आणि नीता अंबानीच्या भेटीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दोघांच्या चेहऱ्यावर गांभीर्य दिसतंय. यावरुन रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी शेवटचा सामना खेळला असा कयास मुंबईचे चाहते लगावतयात. पण या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची पुष्टी झालेली नाही.
संजीव गोएंकांच्या एन्ट्रीने खळबळ
हे कमी की काय लखनऊ सुपर जायंट्स संघाचे मालेक संजीव गोएंका यांनी रोहित शर्माची भेट घेतली. त्यामुळे रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स सोडण्याच्या चर्चेत आणखीनच भर पडली. संजीव गोएंका पुढच्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्समधून खेळण्याची ऑफर तर नाहीत ना, असा अंदाजही क्रिकेट चाहते लगावतायत.
रोहितची आयपीएल 2024 मधली कामगिरी
रोहित शर्मासाठी आयपीएलचा हा हंगाम फारसा समाधानकारक राहिलेला नाही. रोहित शर्माने या हंगामात 14 सामन्यात 417 धावा केल्या. रोहित शर्माच्या बॅटमधून एक शतक आणि एक अर्धशतक निघालं.
प्ले ऑफमधून हे संघ बाहेर
लखनऊने मुंबईचा पराभव केल्यानंतरही प्लेऑफच्या शर्यतीतून लखनऊ संघ बाहेर पडला आहे. याशिवाय मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज ,गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स या संघांचांही पत्ता कट झाला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबादने प्ले ऑफचं तिकिट मिळवलंय. चौथ्या जागेसाठी चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये चुरस आहे.
0 Comments