-->

Ads

भाऊ निलेश सांबरेंच्या पाहून ती बहिण झाली भावूक माझं पुण्य माझ्या पाठीशी उभं राहील – निलेश सांबरे

भिवंडी : आजच्या जमान्यात लोकांच्या भावना एवढ्या बोथट झाल्या आहेत की रक्ताची नाती देखील एकमेकांपासून दुरावत चालली आहेत. माणूस हा दिवसागणिक आत्मकेंद्री होत चालला आहे. मात्र माणुसकी हरवलेल्या या युगात अनेक मानलेली नाती ही रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ ठरत आहेत. असेच एक उदाहरण देता येईल भिवंडी लोकसभेचे उमेदवार आणि जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष असलेले निलेश सांबरे यांच्या प्रचारादरम्यान घडलेल्या एका प्रसंगाचे . जिजाऊ संघटनेच्या महिला सक्षमीकारण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी ठरलेली महिला ही निलेश सांबरे यांना आपला भाऊ मानते . प्रचारदरम्यान जेव्हा निलेश सांबरे हे जेव्हा आपल्या बहिणीला भेटले तेव्हा ही बहिण भावूक झाल्यचे पाह्यला मिळाले. 



निलेश सांबरे हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार म्हणून  भिवंडीमध्ये प्रचार दौऱ्यावर असतांना एक महिला अचानक त्यांना येऊन भेटली. ही महिला जिजाऊ संघटनेच्या महिला सक्षमीकरण योजनेतील एक लाभार्थी आहे. काही वर्षांपूर्वी निलेश सांबरे यांनी सदर महिलेला स्वतःचा भाजीचा व्यवसाय उभा करण्यासाठी मदत केली होती. निलेश सांबरे हे भिवंडीत येत असल्याचे समजताच ही महिला त्यांना भेटण्यासाठी आवर्जून आली आणि सांबरे यांना आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी भेट देण्याची विनंती केली. निलेश सांबरे यांनीही त्या महिलेच्या विनंतीला मान देत, वेळात वेळ काढून, तिच्या भाजीपाला विक्री व्यवसायाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.


गीता रामचंद्र केणे असे या कष्टकरी महिलेचे नाव असून ती भिवंडीतील गोरसई या गावची रहिवासी आहे. काही वर्षांपुर्वी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये ही महिला आपले जीवन जगत होती. तिचा छोटासा भाजीचा व्यवसाय होता मात्र स्वतःची जागा नसल्यामुळे तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे. गावातील बरेच जण तिचा व्यवसाय बंद पडण्याच्या प्रयत्नात होते. ग्रामपंचायतीतील काही लोकंही तिच्यावर व्यवसाय बंद करण्यासाठी दबाव आणत होते. अशा परिस्थितीमध्ये निलेश सांबरे यांनी सदर महिलेला मोलाची अशी मदत केली. गीता केणे यांना व्यवसाय वाढवण्यासाठी जिजाऊ संस्थेच्या महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली तसेच एक हक्काची जागाही मिळवून दिली. त्याचप्रमाणे गावातील प्रभावशाली व्यक्तींना आणि जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांना सदर महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी सांबरे यांनी सूचना केल्या.


अशी सगळी मदत मिळाल्यानंतर गीता केणे यांनी नवी उभारी घेतली आणि आपलं जीवनमान उंचावलं आहे. आपल्या या यशाचं सगळं श्रेय ती निलेश सांबरे यांना देते. “निलेश सांबरे हे देवासारखे आहेत आणि माझे भाऊच आहेत” अशी भावना गीता यांनी बोलून दाखवली आहे. तसेच “मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत निलेश सांबरे आणि मोनिका ताई यांच्या पाठीशी उभी राहीन आणि त्यांना काहीही कमी पडू देणार नाही. तसेच त्यांनी केलेले उपकारही कधी विसरणार नाही” असेही त्या म्हणाल्या.


निलेश सांबरे यांनाही गीता केणे यांच्या यशाने अत्यंत आनंद झाला. जिजाऊ संघटनेच्या या  निस्वार्थी कार्यामुळे तिच्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. 


निलेश सांबरे यांनी जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून गीता केणे यांच्यासारख्या असंख्य गरजू आणि कष्टकरी स्त्रियांना मदत केली आहे. आणि त्यांच्या जगण्याला नवी दिशा दिली आहे. माझी लहान सहान जी काही पुण्याई आहे ती माझ्या सोबत आहे . या पुण्याइचं फळ २० मे ला होऊ घातलेल्या लोकसभा मतदानाच्या दिवशी नक्की मिळेल असा विश्वास सांबरे यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments