-->

Ads

7 मुलींवर लैंगिक अत्याचार; 'मॅजिक ॲप'ने आवाज बदलून महिला शिक्षक असल्याचं सांगायचा, शिष्यवृत्तीसाठी चर्चेला बोलवायचा अन्...

 posing as female teacher Madhya Pradeshआरोपीने आवाज बदलणाऱ्या (व्हॉईस चेंजिंग) ॲपच्या 

माध्यमातून मुलींना संपर्क केला होता.




भोपाळ- मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने महिला शिक्षक असल्याचं भासवून कमीत कमी सात आदिवासी मुलींवर बलात्कार केला आहे. आरोपीने आवाज बदलणाऱ्या (व्हॉईस चेंजिंग) ॲपच्या माध्यमातून मुलींना संपर्क केला होता. तो शिष्यवृत्ती संदर्भात चर्चा करण्याच्या बहाण्याने मुलींना एका ठिकाणी बोलवायचा, त्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा.

जानेवारी ते मे महिन्याच्या दरम्यान त्याने सात आदिवासी मुलींवर अत्याचार केल्याची माहिती आहे. याप्रकरणी आतापर्यंत चार तक्रारी दाखल झाल्या आहेत. एक मुलगी दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत आरोपीला भेटायला गेली होती. त्यावेळी त्याने अल्पवयीन मुलीवरही बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आल्यानंतर त्याने आतापर्यंत सात जणांवर बलात्कार केल्याचे कबुल केले आहे.



पीडित मुलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पीडित मुलींनी बलात्काराची तक्रार केली आहे, पण सामूहिक बलात्कार झाल्याचं सांगितलं नाही. आरोपीच्या दोन सहकाऱ्यांना देखील अटक करण्यात आली आहे. तूर्तास तपास सुरु आहे, एसपी सिद्धी रविंद्र वर्मा यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.


जानेवारी महिन्यापासून हा प्रकार सुरु होता. आतापर्यंत एकाही पीडितीने तक्रार दाखल केली नव्हती. पण, पाच-सहा दिवसांपूर्वी एका पीडितीने पोलिसांकडे येऊन तक्रार दाखल केली. जेव्हा तपास सुरु करण्यात आला तेव्हा कळालं की आरोप याच पद्धतीने महिलांच्या आवाजात मुलींशी संपर्क साधायचा. मुख्य आरोपी ब्रजेश प्रजापती याला अटक करण्यात आली असून त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते.


Post a Comment

0 Comments