-->

Ads

मुंबई पोलिसांनी इंस्टाग्राम रिल्सच्या मदतीनं पकडली दोन बहिणींची चोरी; वयोवृद्ध जोडप्याला घातलेला 55 लाखांचा गंडा

Mumbai News: सोशल मीडियावर रिल्स बनवणं हा एक ट्रेंड आहे. पण या रिल्समुळेच 55 लाखांची चोरी करणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना मुंबई पोलिसांनी गजाआड केलंय, काय आहे हा प्रकार?

Mumbai News Today: इंस्टाग्रामवर रिल्स बनवणे आणि ते सोशल मीडियावर शेअर करणे हा एक ट्रेंडच आहे. पण हा ट्रेंड मुंबई पोलिसांच्या मदतीस आला आहे. 55 लाखांची चोरी करणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना पोलिसांनी पकडलं आहे. छाया वेतकोली आणि भारती वेतकोली असं या दोन सख्ख्या बहिणींना अटक केली आहे.

 छाया वेतकोली (24) आणि भारती वेतकोली (21) यांनीही चोरीचे दागिने आणि कपडे घालून 'रील्स' किंवा छोटे व्हिडिओ बनवले आणि ते इन्स्टाग्रामवर अपलोड केले, असे काळाचौकी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले. घरातून दागिने, कपडे आणि रोख रकमेसह विदेशी चलन गहाळ झाल्याची तक्रार या दाम्पत्याने नुकतीच दिली होती.

वृद्ध व्यक्तीच्या घरात चोरी 

काही दिवसांपूर्वी एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी चोरी झाली होती. त्याची एफआयआर त्याच दिवशी पोलिसात दाखल करण्यात आली. मात्र आरोपींबाबत कोणताही सुगावा पोलिसांना लागला नाही. पोलिसांना या वृद्ध जोडप्याकडून कळले की, त्यांच्याकडे काम करणाऱ्या मुलींना रिल्स बनवून इंस्टाग्रामवर अपलोड करण्याची आवड होती. दरम्यान, पोलिसांनी इंस्टाग्रामवर तरुणीचा शोध सुरू केला. 

रायगडशी थेट कनेक्शन 

पोलिसांनी इनवेस्टिगेशन करताना इंस्टाग्राम अकाऊंटवरुन लोकेशन ट्रेस केलं. त्यावर या मुलींचं लोकेशन थेट महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात सापडलं. तातडीने पोलिसांनी एक टीम येथे रवाना झाली. आणि दोन्ही आरोपी मुलींना ताब्यात घेऊन मुंबईत आणण्यात आलं. चौकशी दरम्यान समजले की, दोघ्या सख्ख्या बहिणी आहेत. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही बहिणींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 381 (कारकून किंवा नोकराकडून चोरी) आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

मुंबईत इंजिनियरची फसवणूक 

ठाण्यातूनही फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. शेअर मार्केटमध्ये मोठा नफा कमावण्याच्या बहाण्याने एका अभियंत्याची 3.7 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील ठाण्यात पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या वाशी येथील रहिवासी असलेल्या 43 वर्षीय अभियंत्याने 17 फेब्रुवारी 2024 रोजी त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची लिंक पाहिली होती. नवी मुंबई सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक गजानन कदम यांनी सांगितले की, अभियंत्याने लिंकवर क्लिक केले आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगला नफा कमावल्याची माहिती मिळाली.


Post a Comment

0 Comments