-->

Ads

मातीची गाडी पकडून साठ हजारात तोडी केल्याची चर्चा !

 ठाणेदार व  यांना सदर प्रकरणाची माहिती आहे का नाही ?


  यवतमाळ प्रतिनिधी :- संजय जाधव 


बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या , निंगनूर बीट मध्ये , निंगनूर जवळ काल रात्री जवळपास १ वाजेच्या सुमारास, मातीची गाडी पकडून ६० हजारात तोडी करून, कोणतीही कारवाई न करता सोडून दिल्याची माहिती आहे. सदर कारवाई ही ठाणेदार व संबंधित बीटचे बीट जमादार यांच्या आदेशाने झाली का ? की कारवाई करणारे दुसरेच कोणी होते ? घटनास्थळावर प्रत्यक्ष कारवाई करून   मलिदा खाणारे चेलेचपाटे कर्मचारी असल्याची चर्चा नागरिक करत आहेत.



सदर कारवाई ठाणेदार व बीट जमादाराच्या जर माघारी होत असेल तर, हे चेले किती पुढे पोहोचले असतील ? याची शहानिशा अधिकाऱ्याने करणे जिकिरीचे बनले आहे. याचा अर्थ अधिकाऱ्याचा कुणावरही वचक राहिला नाही का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

निंगनूर येथील शेतकरी संतोष आडे हे आपल्या घरच्या बांधकामासाठी सरपंच यांच्या विहिरीवरून त्यांच्या परवानगीने, माती घरच्या बांधकामासाठी नेत होते. परंतु सदर शेतकऱ्यास वाटेतच रोखून बिटरगाव पोलीस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांची गाडी चौकीला लावण्याचा दम दिला असता, सदर गरीब शेतकऱ्याने घाबरून त्यांना नाईलाजास्तव त्यांच्या मागणीप्रमाणे  काही रकम देण्यात आल्याची माहिती आहे. ढाणकी व परिसरात अवैध धंद्याचा सुळसुळाट वाढला आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे येथील कायदा व सुव्यवस्था नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी. अशी मागणी जनतेतून होत आहे.

Post a Comment

0 Comments