-->

Ads

सात वर्षीय चिमुकली उमेमा ने ठेवला पहिला रोजा 11 मार्च पासून रमजान मास आरंभ

प्रतिनिधी। फुलसावंगी:संजय जाधव 

इस्लाम धर्माच्या पाच मुख्य - कर्तव्यामध्ये रोजा (उपवास) यास मोठे महत्व प्राप्त आहे. - पवित्र कुराणमध्ये तुमच्या अंगी ईश परायणता यावी व तुमच्या जवळपास असलेल्या रंजल्या गाजल्यांवर येत असलेल्या उपासमारीची तुम्हाला जाण व्हावी या उद्देशाने तुमच्या वर रोजे फर्ज करण्यात आल्याचे उल्लेख आहे. म्हणून प्रत्येक मुस्लिम धर्मीयांना - रोजे ठेवणे अनिवार्य असते.

रोजा मध्ये सूर्यादया पूर्वी निहारी - केली जाते. ज्याला सहेरी असे म्हटले जाते. व सूर्यादया नंतरच मग हे रोजा सोडल्या जाते. या प्रकियेला

इफ्तार असे म्हटले जाते. प्रत्येकाच्या जीवनातील पहिला रोजा हे एक अविस्मरणीय भाग असतो. उपवासाचा प्रथम दिवस जणू एखाद्या घरगुती कार्यक्रमा प्रमाणे साजरा केला जातो व आयुष्य भर आठवणीत सुद्धा राहतो.

फुलसावंगी येथील पत्रकार तसलीम शेख यांची कन्या सात वर्षीय उमेमा मरयम तसलीम शेख या बालिकेने सोमवार 11 मार्च रोजी पवित्र रमजान महिन्याच्या सुरुवातीला आपल्या जीवनातील पहिला उपवास पूर्ण केला. उन्हाळ्याच्या दिवसात पहिल्या वर्गातील उमेमा ने रोजा केल्याने तिचे कौतुक होत आहे.

 

Post a Comment

0 Comments