-->

Ads

हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा, एक अटकेत जुगारा वर कारवाई ऐवज जप्त

अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले 











माहागाव  प्रतिनिधी- संजय जाधव :रविवार रोजी महागाव पोलिसांनी फुलसावगी येथे पाय पसरत असलेल्या अवैध व्यवसायाला लक्ष करत धाड सत्र राबविले ज्या मुळे अवैध व्यवसायिकांची चांगलीच दाणादाण झाली होती.या कारवाईत महागाव पोलिसांनी अवैध दारू भट्टी सह जुगारावर कारवाई करून एका स ताब्यात घेतले.महागाव पोलिसांच्या या कारवाईने अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे.

फुलसावंगी येथे अवैध व्यवसाय हळूहळू आपली पायेमुळे मजबूत करत आहेत.या वर कारवाईचा बगडा पोलिसांच्या वतिने कमी प्रमाणात उचलण्यात येतो. मात्र ही धारणा रविवारी महागाव पोलिसांनी खोडून काढली.रविवारी फुलसावगी येथील अवैध व्यवसायावरील कारवाईने गाजविले.येथील पैनगंगा नदी तीरावर सुरू असलेल्या गावठी दारू निर्मितीचा हातभट्टी वर धाड टाकून या ठिकाणचा मोहमाच व 50 लिटर दारू जप्त करून नष्ट केली तसेच अवैध दारू भट्टी वर काम करणाऱ्या एकास अटक करण्यात पोलिसांना यश आले.या कारवाई मध्ये पोलिसांनी जवळपास 12 हजाराचा मुद्देमाल नष्ट केला तर दुसऱ्या कारवाईत येथील वर्दळीच्या ठिकाणी बस स्थानक परीसरातील किनवट पॉईन्ट नजीक सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून नगदी रकमे सह एका वर कारवाई केली तर आगामी सण उत्सवाना लक्षात घेता येथे 8 जणांना कलम 149 च्या नोटिसा तामिल करण्यात आल्या.

रविवारी अचानकच महागाव पोलीस ऍक्शन मोड वर आल्याने एरव्ही बिनदास्त अवैध व्यवसाय चालवणाऱ्या ची एकच तारांबळ उडाली होती.तर सर्व सामान्य नागरिकांतून कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.महागाव पोलिसांनी या मागील सहा महिन्यात फुलसावंगी बिट मध्ये अवैध दारू विक्री, जुगार व मटक्यावर सर्वाधिक म्हणजे 30 पेक्षा जास्त कारवाह्या केल्या आहेत.तर येत्या काही दिवसात पोलीस जुगार , मटका, गांजा अशा व्यवसायाना लक्ष करून कारवाई करणार असल्याची माहिती गोपनीय सूत्रा कडून मिळत आहे.आजची कारवाई महागाव चे ठाणेदार सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बिटजमादार निलेश पेंढारकर, शेख वसीम, अमित नाळे, शेख मुबिन, उमेश तीलेवाढ यांनी केली.



Post a Comment

0 Comments