Dombivli News : डोबिवलीत इन्स्टा रील शूट करुन एका तरुणाने थेट खाडीत उडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. डोंबिवलीतल्या मोठागाव जवळील माणकोली पुलावर हा सगळा प्रकार घडला. बचाव पथकाकडून तरुणाचा शोध सुरु आहे.
Dombivli News : डोंबिवलीतून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. डोंबिवलीतल्या मोठागाव जवळील माणकोली पुलावर मित्रांसमवेत व्हिडीओ शूट केल्यानंतर एका तरुणाने थेट खाडीत उडी मारली. इन्स्टाग्राम रील बनवल्यानंतर या 25 वर्षीय तरुणाने अतिउत्साहाने माणकोली पुलावरून थेट खाडीत उडी मारली. यावेळी त्याच्यासोबत त्याचे मित्र देखील होती. मात्र काही कळायच्या आतच त्याने हे कृत्य केल्यानं सर्वांना धक्का बसला आणि त्यांनी आरडाओरडा सुरु केला. पण काहीवेळातच खाडी उडी मारलेला मुलगा दिसेनासा झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. या घटनेनंतर माणकोली परिसरात खळबळ उडाली असून तरुणाचा शोध सुरु आहे.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. माणकोली पुलावर मित्रांसमवेत रील बनविल्यावर या तरुणाने थेट खाडीत उडी मारली. या घटनेनंतर खाडी परिसरातील लोकांनी आरडा ओरडा करून तरुणाच्या बचावासाठी प्रयत्न केले. मात्र, काही वेळाने तरुण खाडीत दिसेनासा झाला. याची माहिती तात्काळ विष्णुनगर पोलीस, कल्याण डोंबिवली पालिका अग्निशमन विभागाला देण्यात आली. प्रशासनाने तातडीने मोठागाव खाडी किनारी येऊन बेपत्ता तरुणाचा शोध सुरू केला आहे. सध्या या तरुणाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित अशोक मोर्या असे खाडीत उडी मारलेल्या तरुणाचे नाव आहे. तोतो भिवंडीमधील साईनगर मधील कामतघर येथील साई मंदिर परिसरात राहत होता. रोहित दुपारी एका मित्रासोबत नवीनच बांधण्यात आलेल्या माणकोली पूल येथे रील बनवण्यासाठी आला होता. माणकोली पुलावर मित्रांसोबत तो रील काढत होतो. रील बनवल्यानंतर त्याने अचानक पुलावरून खाली उडी मारली. तिथे उपस्थित असलेल्या त्याच्या मित्रांना काही समजण्यापूर्वीच तो खाली पडला. व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर रोहितने अचानक पुलावरून खाडीत उडी मारली. आम्हाला त्याला पकडण्याची किंवा थांबवण्याची संधी मिळाली नाही, असे रोहितच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले.
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. शुक्रवारी दुपारपासून तरुणाचा शोध सुरू करण्यात आला आहे. मात्र, या तरुणाबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. त्याचबरोबर या प्रकरणी मित्रांकडे चौकशी केल्यानंतर विष्णुनगर पोलीस आत्महत्या आणि अपघात या दोन्ही बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, रोहितचा कोणासोबतही वाद नव्हता किंवा तो कोणत्याही तणावाखाली नव्हता, असे त्याच्या मित्रांनी सांगितले. मात्र तरी त्याने हे कृत्य का केले याबाबत मित्रांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.
0 Comments