PM Modi in Nashik Mumbai Maharashtra LIVE Updates: शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून, नाशिकमधून त्यांचा हा दौरा सुरु होणार आहे. ज्यानंतर मुंबईतील नवा सी लिंक अर्थात शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचं लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या धर्तीवर सध्या सत्ताधारी भाजप पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा विविध कार्यक्रम आणि प्रस्तावित प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर लोकार्पण सोहळ्यांना हजेरी लावताना दिसत आहेत. जास्तीत जास्त नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याला ते प्राधान्य देत आहेत. याच धर्तीवर मोदींचा महाराष्ट्र दौरा सुरु होत आहे. नाशिकमधून त्यांचा हा दौरा सुरु होणार असून, इथं पंतप्रधान मोदींचे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
मोदींचा नियोजित नाशिक दौरा सकाळी सव्वा अकरा वाजता सुरु होणार होता. मात्र पंतप्रधान सकाळी सव्वा दहा वाजताच नाशिकमध्ये दाखल होतील. नाशिकमध्ये पंतप्रधान रोड शो करणारेत. त्यानंतर ते काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतील आणि गोदातिरावर महाआरती करतील. त्यानंतर मोदींकडून या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उदघाटन होईल. नाशिकनंतर मोदी मुंबईकडे रवाना होतील.
0 Comments