-->

Ads

मला एकट्याला खासदार व्हायचे नसून भिवंडी लोकसभेतील वीस लाख नागरिकांना खासदार करायचे आहे

निलेश सांबरे जिजाऊ संघटनेच्या माध्यामातुन लढवणार भिवंडी लोकसभा निवडणुक वासिंद येथील जिजाऊ संघटनेच्या निर्धार मेळाव्यात रेकॉर्ड ब्रेक गर्दी.सर्वसामान्य लोकांच्या समस्यांचा बाजार मांडून स्वत:ची भाकरी भाजणा-र्यांना आता आपल्याला वनवासाला पाठवायचे आहे 


शहापूर / वासिंद  :  गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असलेला निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेचा निर्धार मेळावा अखेर शहापूर तालुक्यातील वासिंद येथे अफाट जनमुदायाच्या उपस्थितीत पार दि. 27 जानेवारी रोजी पार पडला . याच कार्यक्रमात सांबरे यांच्या मातोश्री आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ. भावनादेवी भगवान सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले होते.

निलेश सांबरे यांनी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून गेली १५ वर्ष ठाणे , पालघर , रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील अनेक गाव तालुक्यांत जनसामान्यांसाठी अनेक मोफत उपक्रम राबविले आहेत. अनेकांना आरोग्य , शिक्षण , रोजगार यांसाठी संस्थेच्या माध्यमातून मदत केली आहे. म्हणूनच जनमानसातून भावी लोकप्रतिनधी म्हणून निलेश सांबरे यांचे नाव सातत्याने पुढे येऊ लागले आहे.  त्यांच्या जिजाऊ संस्थेच्या कामांची जोरदार चर्चा आहे. या कामांमुळेच जनमानसांत त्यांची एक चांगली प्रतिमा निर्माण होवून . अशी व्यक्ती राजकारणात येऊन ती लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला मिळावी  अशी मागणी जनतेतून सातत्याने येऊ लागली आहे. येणारी लोकसभा खासदारकीची निवडणूक आपण लढवावी अशी असंख्य कार्यकर्त्यांची देखील मागणी आहे.   या सगळ्याचा विचार करून दिनांक २७ जानेवारी रोजी जिजाऊ संघटनेच्या वतीने या निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 


या  कार्यक्रमात जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की,  मी गेल्या अनेक दिवसांपासून भिवंडी लोकसभा मतदारसंघात कार्यक्रमादरम्यान फिरत आहे. लोकांसोबत चर्चा करत आहे. यावेळी मला एक गोष्ट प्रत्येकाने बोलून दाखवली की ही निवडणूक आपण लढवावी समाजाला तुमच्या सारख्या खंबीर आणि परिवतर्न घडणाऱ्या माणसाची गरज आहे. कोणतीही सत्ता हातात नसताना जर आपण एवढे मोठे बदल समाजात केले आहेत तर सत्तेत आल्यास अजून चांगली विधायक कामे करता येतील. या लोकांच्या भावनेचा आदर राखूनच आजचा हा निर्धार मेळावा आपण आयोजित केला असल्याचे सांगत निवडणूक लढवणे हा माझा हेतु कधीच नव्हता . मात्र आज तुम्ही आम्ही आपण सर्वांनी मिळूनच आजचा हा निर्णय घ्यायचा आहे असे देखील ते म्हणाले तर निवडणुक हे माझ्यासाठी चहामध्ये बिस्किट बुडवुन खाण्याइतके सोपे आहे. असे सांगत प्रस्थापित राजकरण्यांना खुले आवाहन दिले . तर यावेळी भिवंडी लोकसभा क्षेत्रातल्या  नागरी समस्यांवर भाष्य करताना आतापर्यंत यापुढे जो सर्वसामान्य लोकांच्या समस्या , सर्वसामान्य लोकांची दु :ख यांचा बाजार मांडून स्वत:ची भाकरी भाजणा-र्यांना आता आपल्याला वनवासाला पाठवायचे आहे असे सांगत विरोधकांवर टीकेची झोड उठवली .
या निर्धार मेळाव्यासाठी  निलेश सांबरे यांच्या नेतृत्वावर विश्वास असलेले आणि त्यांच्या समाजसेवेने प्रभावित असलेले भिवंडी लोकसभा मतदार संघातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच राजकीय , सामाजिक, शैक्षणिक , अध्यात्मिक क्षेत्रातील विविध मंडळी आणि गाव खेड्यातील सांबरे यांच्यावर प्रेम करणारी असंख्य माणसं या ठिकाणी आलेली होती.  यावेळी ठाणे पालघर जिल्ह्यातील विविध समस्यांवर भाष्य करताना सांबरे म्हणाले की शहापूर मुरबाड भागातील पाण्याची समस्या , आरोग्याची समस्या आजाही इथल्या सर्वसामन्यांना भेडसावत आहे. दर्जेदार शिक्षणापासून आजही आमचा माणूस वंचित आहे, आजही आमच्या माता भगिनींची प्रसूती रस्त्यात , राना वनात काट्या कुट्यात होते. हे भयाण वास्तव बदलायचे कुणी ? ज्यांना हे बदलण्यासाठी आम्ही निवडून दिले आहे ते जर हे बदल घडवणार नसतील तर मग आता तुम्ही आम्ही मिळूनच हा बदल घडवायचा आहे. आणि हाच आजचा आपला निर्धार आहे. असे सांगत जनतेला या निर्धार मेळाव्यात अवाहन केले. 

मला एकट्याला खासदार व्हायचे नसून भिवंडी लोकसभेतील वीस लाख नागरिकांना खासदार करायचे आहे. जोपर्यंत हा बदल आपण घडवत नाही तोपर्यंत  आपल्या संघर्षाची लढाई आता थांबणार नाही . त्याचबरोबर जिजाऊचे समाजसेवेचे काम तर माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत चालूच राहिली असे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत "निलेश सांबरे आगे बढो हम तुम्हारे साथ है चा नारा दिला" तर यावेळी जिजाऊ च्या कामांवर आरोप करणाऱ्यांना निलेश सांबरे यांनी
 " मिट्टी मे मिला दो मै जुदा हो नही सकता 
अब इस से ज्यादा मे तेरा हो नही सकता "
अश्या खास शैलीत एका  शायरी मध्ये दिले उत्तर दिले.

या निर्धार मेळाव्यात जिजाऊ संघटनचे अध्यक्ष निलेश सांबरे हे येणारी लोकसभा निवडणूक लढवणार की नाही ? त्यांची भूमिका काय असेल ? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे स्पष्ट करत  जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी चांगलीच वातावरण निर्मिती केल्याने या भव्य दिव्य निर्धार मेळाव्याने मात्र राजकिय आणि प्रस्थापितांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून २००८  पासून संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे हे  पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ५ जिल्ह्यांतील वंचित समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार, कृषी आणि महिला सक्षमीकरण या पंचसूत्रीवर काम करत आहेत. अतिशय अल्प काळात कोकणच्या विकासाचे मॉडेल निलेश सांबरे यांनी उभे केले आहे. आज व्यवसायातल्या आपल्या उत्पन्नातून ८० टक्के रक्कम ही समाजसेवेसाठी समाजाच्या हितासाठी निस्वार्थी भावनेने ते खर्च करत आहेत. आणि म्हणूनच इथल्या व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवणारा चेहरा म्हणजेच निलेश सांबरे ही त्यांची ओळख बनली आहे. याच जनाधाराच्या बळावर आणि सामाजिक कार्याच्या जोरावर येणारी लोकसभा निवडणूक आपण स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर करत गरज पडली तरच आपल्या जिजाऊ संघटनेची विचारधारा ज्याला पटत असेल त्यांच्या सोबत असू असे देखील ते म्हणाले .यावेळी कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाह्यला मिळाला . या अगोदर झालेल्या भिवंडी , कल्याण, मुरबाड , वाडा येथील कार्यकर्ता मेळाव्याला देखील मोठ्या संख्यने कार्यकर्ते आणि स्थानिक लोकांची  उपस्थिती होती . तर दि 27 जानेवारी रोजी वासिंदच्या या निर्धार मेळाव्यात उसळलेला लाखोंचा जनसागर याने निलेश सांबरे यांनी अर्धी लढाई निवडणुकी आधीच जिंकली असल्याची चर्चा नागरिकांतून रंगली होती.यावेळी हिंदु धर्मगुरु अलोकनाथ महाराज यांनी या मेळाव्यात बोलाताना सांगितले की निलेश सांबरे यांच्या रुपाने युगपुरुष जन्माला आले आहेत .त्यामुळे असे प्रतिनिधीत्व समाजाला नक्कीच तारेल असा विश्वास व्यक्त केला .तर उपस्थित असलेले मुस्लीम समाजाचे  मौलाना बाबा फरुद्दीन अली मोहम्मद अश्रफी म्हणाले की सध्याच्या युगात माणुस माणसाला विचारत नसताना निलेश सांबरे यांच्यासारखी माणसाला माणूस म्हणून मदत करणारी व्यक्ती ही दैवी कार्य करत आहे . तर बौध्द भंते विनय बोधी म्हणाले की या जिल्ह्याला आणि तालुक्यात सकारात्मक बदल घडवण्याची ताकद ही निलेश सांबरे   यांच्यात असुन जनतेचा कौल त्यांना मिळालेला आहे . त्यामुळे त्यांनी पाउल पुढे टाकावे . ते बद्ल करतील याची खात्री आहे .या कार्क्रमात उपस्थित असलेल्या जिजाऊच्या विविध सुविधांचा लाभ घेउन आपल्या जीवनात यश मिळवलेल्या अनेकांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले . सहाय्यक कामगार आयुक्त म्ह्णुन कर्तव्यावर असलेले नागनाथ लाड यांनी जिजाऊ आणि  निलेश सांबरे यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करताना " पाय जमिनीवर असावे अंबर कवेत घेताना...हसु असावे ओठांवरती काळीज काढुन देताना"अश्या कवितांच्या ओळींमधुन आपल्या भावना व्यक्त केले .याप्रसंगी वाराणसी येथील आयटीची विद्यार्थीनी असलेली समृद्धी जाधव या खानिवली वाडा तालुका  येथील मुलीने जिजाऊने केलेल्या मदतीबद्द्ल आभार व्यक्त करताना सांगितले की मी देव तर नाही पाहिला पण आप्पांना म्हणजेच निलेश सांबरेंना पाहिले कदाचित देव असाच असावा . या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या . तर जिजाऊ आणि निलेश सांबरे यांच्या केलेल्या मदतीने अग्निशमन दलात नोकरीस लागलेल्या मोहिनी भारमल यांच्या सासुबाईना यांना आपल्या भावना व्यक्त करताना गहिवरुन आले .यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा देखील ओलावल्या होत्या .लाखोंच्या गर्दीत वाशिंद येथे पार पडलेल्या या जिजाऊ संघटनेच्या भव्य अश्या  निर्धार मेळाव्यात जिजाऊ .धनवंत तिवारी (सदस्य बोर्ड सल्लागार समिती नागरी विमान वाहतूक आणि रेल्वे मंत्रालय), सहाय्यक कामगार आयुक्तनागनाथ लाड यांसह जिजाऊ संघटनेचे कार्यकर्ते,पदाधिकारी तसेच लाखोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.







Post a Comment

0 Comments