-->

Ads

जे ई एस इंग्लिश स्कूल मध्ये गिरवला जाणार विज्ञानाचा धडा


 जोगेश्वरी एज्युकेशन सोसायटीच्या जे ई एस इंग्लिश स्कूल या शाळेत के पी ईस्ट वॉर्ड चे विज्ञान प्रदर्शन 2023-24 दिनांक 12,13 व 14 डिसेंबर रोजी भरवण्यात येणार आहे. संबंधित विज्ञान प्रदर्शनात 124 शाळा सहभागी होणार आहेत.  





'समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान' या विषयावर 75 शाळांमधून विज्ञानाधिष्ठित प्रकल्प विज्ञान प्रदर्शनात ठेवले जाणार आहेत.


विज्ञान प्रदर्शना दरम्यान, मानवासारखे दिसणारे रोबोट, स्मार्ट फार्मिंग, त्याचबरोबर उमेश राऊत यांचे भारतीय बनावटीच्या विमानांची प्रात्यक्षिके ही या प्रदर्शनाची खास आकर्षण असणार आहे. संबंधित कार्यक्रमात ड्रोन द्वारे पुष्प वर्षावही केला जाणार आहे. तसेच अनेकविध विस्मयकारी प्रात्यक्षिकही असणार आहेत. तसेच दिनांक 14 डिसेंबर रोजी सायंकाळी लेझर शो जे ई एस इंग्लिश स्कूल पटांगणात आयोजित केलेला आहे.संबंधित विज्ञान प्रदर्शनाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे, अशी माहिती कार्यवाह श्री किरण कामत व मुख्याध्यापिका सौ कविता सिंघी यांनी दिली.




Science lesson to be taught in JES English School


KP East Ward Science Exhibition 2023-24 will be held on 12th, 13th and 14th December at JES English School of Jogeshwari Education Society. 124 schools will participate in the respective science exhibition. On the theme 'Science and Technology for Society', science-based projects from 75 schools will be put up in the science exhibition.



During the science exhibition, humanoid robots, smart farming, as well as demonstrations of Indian-made aircraft will be the special attraction of this exhibition. In the related event, flowers will be showered by drones. There will also be many amazing demonstrations. Also on 14th December evening laser show is organized at JES English School Turf Ground. The timing of the related science exhibition will be from 9.00 am to 5.00 pm

informed by Hon. Secretary Mr. Kiran Kamat and Principal Mrs. Kavita Singhi.

Post a Comment

0 Comments