Raigad Accient News: या अपघातात वैभवच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या. अखेर तो जागीच मृत्युमूखी पडला. वैभव कथारे हा तरुण सोशल मीडियावर अत्यंत माहितीपूर्ण आणि रंजक विडिओ बनवत असे.
रायगड : रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील ३८ वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ख्रिसमसच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडली आहे. वैभव कथारे असं अपघातात मृत्यू झालेला या युवकाचं नाव आहे. पनवेल तालुक्यातील एक उदयोन्मुख मोटिवेशनल स्पीकर वैभव कथारेवर काळाने क्रूर घाला घातला आहे. वैभव रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास अपघाती मरण पावला आहे. या घटनेनं पनवेल परिसरात शोककळा पसरली आहे.
पनवेलमध्ये संकल्प सोसायटी, मिडल क्लास सोसायटीजवळ राहत असलेला वैभव आपली ऍक्टिवा स्कूटी क्रमांक एमएच ४६ बीजी ४८६५ने आपल्या घरी परतत असताना तो एसटी स्टॅन्ड परिसरात ब्रिजखाली आला. त्याचवेळी समोरून पेण बाजूने श्रीवर्धन बस डेपोची बस क्रमांक एमएच ०६ बीडब्लू ७९९३ ही बस येत होती. ही बस चालक विनोद विलास चव्हाण (वय ३३) चालवत होते. बस पनवेल एसटी स्टॅन्डमध्ये शिरत असताना वळण घेताना बस चालकाने अत्यंत बेदरकारपणे भरधाव वेगात येत समोरून जाणाऱ्या वैभवच्या ऍक्टिवा स्कूटीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की गाडी रस्त्यावर आपटली आणि वैभव गाडीवरून फेकला जाऊन रस्त्यावर पडला.
या अपघातात वैभवच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या. अखेर तो जागीच मृत्युमूखी पडला. वैभव कथारे हा तरुण सोशल मीडियावर अत्यंत माहितीपूर्ण आणि रंजक विडिओ बनवत असे. 'वैभव कथारे मोटिवेशन अँड फॅक्टस' नावाने त्याचे युट्युबवर चॅनेल होते, तर तो इंस्टाग्रामवर देखील फेमस होता. त्याच्या अचानक अपघाती मृत्यूने मोठी हळहळ व्यक्त होत आहे. एक उत्तम सादरकर्ता आणि उदयोन्मुख मोटिवेशनल स्पीकर गमावल्याचे दुःख अनेकजण व्यक्त करत आहेत.
0 Comments