-->

Ads

गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय पुसद येथे नॅक पीअर टिमची भेट

 प्रतिनिधी: राजकुमार भगत :बेलोरा, पुसद : दर्जेदार उच्च  शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने नॅक व्दारे महाविद्यालय तसेच विद्यापीठाचे श्रेणिकरण करण्यात येत असते त्या अनुषंगाने आज दि. २२ डिसेंबर २०२३ ला  गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय पुसद येथे  नॅक पीअर टीम ने भेट दिली.


प्रोफेसर बी.पी.संजय माजी कुलगुरू केंद्रीय विद्यापीठ तामिळनाडू नॅक पीअर टीम चे अध्यक्ष तसेच प्रोफेसर बिभुती  भुषण मलिक विभाग प्रमुख समाजशास्त्र विभाग बाबासाहेब भिमराव आंबेडकर विद्यापीठ लखनौ उत्तर प्रदेश तसेच प्रोफेसर गोपाल जी मिश्रा समाजकार्य विभाग सिलचर  आसाम यांचा समावेश असलेल्या पीअर टिमने महाविद्यालयाला भेट देउन अभ्यासक्रम,  क्षेत्रकार्य, राष्ट्रीय सेवा योजना, ग्रंथालय बाबत माहिती जाणून घेतली तसेच विस्तार कार्याची तज्ञ समितीने विषेश प्रशंसा केली सोबतच रासेयो पथकाने दत्तक घेतलेल्या खर्षी गावाला भेट देऊन कार्याचा आढावा घेतला.


समाजकार्य महाविद्यालयात आजच्या भेटीत या पिअर टीमने पालक, माजी विद्यार्थी तसेच आजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने सादर केलेल्या महाराष्ट्रीयन सांस्कृतिची ओळख करून देणाऱ्या व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर भाष्य करणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक केले.










Post a Comment

0 Comments