-->

Ads

यवतमाळ विश्रामगृह येथे अ.भा.आदिवासी विकास परिषदेची जिल्हा कार्यकारणी गठीत



जिल्ह्यात लवकरच आदिवासी बांधवांसाठी राष्ट्रीय अधिवेशन घेणार - शिवाजीराव मोघे 

          यवतमाळ :  अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद  देशातील प्रमुख मातृसंघटना असून या संघटनेची बैठक यवतमाळ येथील स्थानिक विश्रामगृहात जिल्हा कार्यकारणीची नवनियुक्त पदाधिकारी तथा जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली .दरम्यान अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोघे साहेब ,  प्रदेशाध्यक्ष राम साहेब चव्हाण , राष्ट्रीय समन्वयक जितेंद्र मोघे , विदर्भ अध्यक्ष चंद्रशेखर मडावी , यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुनील ढाले, प्रदेश महासचिव केशव तिराणिक , आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी , एम के कोडापे सह  जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकारी तथा तालुका स्तरावरील शेकडो बांधव उपस्थित होते.

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर

     याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.शिवाजीराव मोघे यांनी थोडक्यात परिषदेचा इतिहास सांगितला तसेच कार्यकर्त्यांना  प्रशिक्षण शिबिराची आवश्यकता सुद्धा असल्याचे यावेळी नमूद केले. परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राम चव्हाण यांनी विद्यार्थी दशेपासूनच शासकीय नोकरीत असताना सुद्धा परिषदेसाठी सतत काम केले आणि त्यामुळेच  मला महत्त्वाची पदे हेही प्रांजळपणे कबूल केले.केशव तिरानिक यांनी विकास परिषदेच्या नावावर काही समाज कंटक अपप्रचार करीत आहेत विदर्भ विकास परिषद केवळ संस्था असून त्यामध्ये फक्त 9 सदस्य आहेत. म्हणून अश्या थोतांडापासून साधान रहा असे सांगितले. त्याचबरोबर परिषदेचे राष्ट्रीय समन्वयक जितेंद्र मोघे यांनी कुणावरही टीका टिप्पणी न करता आपल्या कार्यातून परिषदेचे महत्त्व समाजाला पटवून द्यावे लागेल असे सांगितले. तसेच कुठलाही शासकीय कामाचा पाठपुरावा करण्यात आपण कमी पडतो ही खंतही यावेळी  व्यक्त केली . त्यामुळे शासकीय कामाची जान असणे फार महत्वाचे असल्याचे जितेंद्र मोघे म्हणाले. 

विदर्भ अध्यक्ष चंद्रशेखर मडावी यांनी  अधिकारासोबतच पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी चेही भान ठेवावे हा सल्ला दिला. त्याचबरोबर लवकरच विदर्भामध्ये परिषदेच्या बांधणीसाठी विदर्भ दौरा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला.

यावेळी यवतमाळ आदिवासी विकास परिषद जिल्हा शाखेचे गठन करण्यात आले.उपाध्यक्ष कृष्णा पुसनाके 

उपाध्यक्ष  भीमराव खारोडे सचिव प्रफुल गेडाम  सहसचिव  महादेवराव सीडाम कार्याध्यक्ष राजु चांदेकर कोषाध्यक्ष  डॉ. विनोद डवले

सल्लागार रामकृष्ण चौधरी सल्लागार  बी.टी. कनाके प्रसिद्धी प्रमुख  संतोष गारुळे  सर्वश्री  सदस्य  सुनिल घोरसडे, अवधूत मडावी , कलिराम वेट्टी , राहुल आत्राम , मनोज खडके , अमोल आमले. ते आदिवासी युवा परिषदेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष म्हणून आकाश आत्राम यांची नियक्ती करण्यात आली. तालुका अध्यक्ष : 

यवतमाळ तालुका अध्यक्ष नंदूभाऊ कुडमेथे

दारव्हा अध्यक्ष रामहरी लोखंडे

घाटंजी अध्यक्ष माणिकराव मेश्राम

बाभुळगाव अध्यक्ष अंकुश सोयाम

दिग्रस अध्यक्ष पुरुषोत्तम कुडवे

पूसद अध्यक्ष  गजानन टारफे 

 तालुका अध्यक्ष  प्रकाश शिकारे आर्णी तालुका अध्यक्ष विठ्ठल तुमराम तर युवा सौरभ पारधी सह शेकडो कार्यकर्त्यांची विविध पदावर नियुक्ती करण्यात आली.

Post a Comment

0 Comments