प्रतिनिधी रेखा भेगडे:
साळुंके दाम्पत्यांचा समाजापुढे नवीन आदर्श..!
वाढदिवसा निमित्त अंबरनाथ पहिल्यांदाच शिव पोवाडा गायन कार्यक्रमाचे आगळेवेगळे आयोजन..!
अंबरनाथ :संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त मा.नगरसेवक श्री.सुभाष साळुंके दरवर्षी आगळावेगळा उपक्रम राबवून दि.३० नोव्हेंबर रोजी वाढदिवस साजरा करीत असतात.
नारी इन सुंदर सारी, वुमनिया - मराठी संस्कृती फॅशन शो, महिला सुरक्षा - किचन व नोकरी, विविध प्रकारची पाककला स्पर्धा,असे एक ना अनेक वेगळा ठसा उमटविनारे समाजोपयोगी कार्यक्रम राबवित असतात,
@ यावेळी स.८ वा - ज्येष्ठ नागरिक व जॉगर्स क्लब सदस्यासोबत गावदेवी मैदानात साजरा केला.
@ दु.१२ वा.- आभा कार्ड, ज्येष्ठ नागरीक कार्ड व आयुष्मान भारत आरोग्य कार्ड चे वाटप संवाद जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
@ सायं.८ वा.- गायिका ममता घावरे आणि ग्रुप छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील पोवाडे सादरीकरण करून वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा राहत्या घरी साजरा करण्यात आला. गायनाने शिवकालीन इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला, शुभेच्छा देण्यासाठी आलेले नागरिक, महिला, मुले भारावून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जय कार करू लागले. अनेक जण भावूक झाले. भपकेपणा व धांगडधिना टाळून श्री. सुभाष साळुंके व सुवर्णा साळुंके यांनी पोवाडे गायानातून वाढदिवस साजरा करता येतो, हे यशस्वीपणे समाजापुढे आदर्श ठेवला आहे,असे उपस्थितांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलें.
शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी, सौ.प्रज्ञा बनसोडे(माजी नगराध्यक्षा), सौ. लिना सावंत, सौ. अनिता लोटे, सौ. कल्पना पलंगे, भाजप पदाधिकारी सौ.शहा मॅडम,भजन मंडळ, संवाद फाऊंडेशन पदाधिकारी, युवासेना विधानसभा अधिकारी श्री.हेमंत जाधव व पदाधिकारी, जॉगरस क्लब सदस्य, शिवसंवाद महिला बचत गट संघ, वडवली विभाग-सोसायटी महिला सदस्या इ.मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments