-->

Ads

Crime News: प्रियकरासाठी 60 वर्षीय पतीला कुऱ्हाडीने तोडलं; मग मृतदेहाच्या तुकड्यांसोबत केलं धक्कादायक

 रामपालचं डोकं आणि पाय एका पोत्यात सापडले. दुसऱ्यात हात होते. मात्र धड सापडलं नाही. पोलीस कालव्यात मृतदेहाचा शोध घेत आहेत.












    अनैतिक संबंधातून होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच आता अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. पिलीभीतमधील शिवनगर येथील रामपालच्या मृतदेहाचे अवयव डायोरियाजवळील कालव्यात दोन गोण्यांमध्ये सापडले. एका गोणीत डोकं आणि दोन्ही पाय सापडले. तर, दुसऱ्या सॅकमध्ये हात होते. धड अजून सापडलेलं नाही. गोणी फाटल्याने मृतदेह कालव्यात वाहून गेल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

    पोलिसांनी हत्या प्रकरणातील आरोपी पत्नी दुलारो देवी हिला अटक केली आहे. तिचा प्रियकरही पकडला गेला आहे. गजरौला परिसरातील शिवनगर गावात राहणाऱ्या 60 वर्षीय रामपालची पत्नी दुलारो देवी हिने 24 जुलैच्या रात्री कुऱ्हाडीने वार करून पतीची हत्या केली होती. मुलांची आणि इतरांची दिशाभूल करण्यासाठी तिने पती बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती.

    पोलिसांनी दुलारो देवीची कडक चौकशी केली असता तिने सत्य सांगितलं. तिने सांगितलं की रामपालसोबत रोज भांडण होत असे. 24 जुलै रोजी मुलगा गावातील दुसऱ्या घरात झोपलेला होता. तेव्हाच संधी शोधत तिने खाटेवर झोपलेल्या पतीनचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. त्यानंतर कुऱ्हाडीने मृतदेहाचे तुकडे करून गोणीत भरून निगोही ब्रांच कालव्यात फेकून दिले.

    गुरुवारी सायंकाळपासून पोलीस कालव्यात पोत्याचा शोध घेत होते. शुक्रवारी सकाळी दियोरियाजवळील कालव्यात दोन पोती सापडली. दियोरिया येथील कालव्याजवळून एक तरुण जात असताना त्याला कालव्यात पडलेली पोती पाहून संशय आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून गोणी जप्त केली. पोती उघडली असता त्यामध्ये रामपालच्या मृतदेहाचे तुकडे होते. रामपालचं डोकं आणि पाय एका पोत्यात सापडले. दुसऱ्यात हात होते. मात्र धड सापडलं नाही. पोलीस कालव्यात मृतदेहाचा शोध घेत आहेत.


    असं सांगितलं जात आहे, की दुलारो देवी बरेलीच्या नरियावाल येथे एका कारखान्यात काम करत होती. यादरम्यान तिचे रिठोरा येथील एका तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. दोघे रिठोरा येथील एका घरात वेगवेगळ्या खोलीत राहत होते. तरुणाशी असलेल्या संबंधांमुळे दुलारोचा पती रामपाल याच्याशी वाद होत होता.

    गजरौला पोलिसांनी दुलारो देवीचा प्रियकर आणि त्याच्या मेहुण्याला ताब्यात घेतले आहे. दोघांची चौकशी सुरू आहे. चौकशीत असं आढळून आलं की, काही महिन्यांपूर्वी दुलारो रिठोरा येथे प्रियकरासोबत राहत होती. कडक चौकशी केल्यानंतरही तरुणाने रामपालच्या हत्येत आपला हात असल्याचं नाकारलं आहे. दुलारोही त्याच्याविरोधात कोणतंही वक्तव्य करत नाहीये.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुलारो अतिशय हुशार आहे. पती रामपालची हत्या केल्यानंतर तिने रक्ताळलेली कुऱ्हाड नीट धुवून स्वच्छ करून कपाटात ठेवली होती. इतकंच नाही तर रामपाल ज्या पलंगावर पडला होता, तेथील गालिचे, गादी वगैरेही गोणीत बांधून नदीकाठी फेकण्यात आलं होतं. घराची फरशीही धुतली होती.

    दुलारोची मुलंही तिचा तिरस्कार करतात. लहान मुलगा सोमपालने सांगितलं की, त्याला दोन भाऊ, चार बहिणी आहेत. सर्वात मोठी बहीण सुमारे 32 वर्षांची आहे. सहा महिन्यांपूर्वी दुलारो देवीचे एका तरुणासोबत संबंध असल्याचे कुटुंबीयांना समजले, तेव्हापासून संपूर्ण कुटुंब तिचा तिरस्कार करू लागले. दुलारोचे वय 55 वर्षे आणि तिच्या प्रियकराचे वय 32-33 वर्षे आहे.

    Post a Comment

    0 Comments