-->

Ads

कल्याण-डोंबिवलीचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद

नागरिकांना पुरेसा पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.


कल्याण : कल्याण- डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या उल्हास नदी काठच्या मोहिली, बारावे, नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रांमध्ये विद्युत, यांत्रिकी, देखभाल दुरुस्तीची कामे येत्या मंगळवारी, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वेळेत केली जाणार आहेत. त्यामुळे या कालावधीत या दोन्ही शहरांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, असे यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता राजू राठोड यांनी सांगितले.

बारावे, मोहिली, नेतिवली जलशुध्दीकरण केंद्रातून कल्याण , डोंबिवली शहरे, कल्याण ग्रामीण भागातील टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी परिसराला पाणी पुरवठा केला जातो. मंगळवारी दुरूस्तीच्या कामामुळे कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम, कल्याण ग्रामीण भागाचा पाणी पुरवठा सकाळी नऊ ते रात्री नऊ वेळेत बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता विचारात घेऊन नागरिकांना पुरेसा पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments